बारामती : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

बारामती :  पोलीसनामा ऑनलाईन – अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण अंकुश शिंदे (वय २३, रा. चैतन्य सिटी, सुयोग अपार्टमेंट, बारामती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.

लग्नाच्या अमिषाने ओढले जाळ्यात

किरण शिंदे हा पिडीत मुलीला मागील दीड वर्षांपासून त्रास देत होता. ती घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालत असताना तो तिच्याकडे पाहून हातवारे करायचा. त्यानंतर तिचा हात धरून तू मला खूप आवडतेस अशी बतावणी तिला अनेकवेळा केली. मात्र त्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक वाढवली आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचेही अमिष दाखवले. त्यानतंर त्याने १० मे रोजी तिला आपल्या घरी बोलवले. त्यावेळी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतल्यावर पोलिसांनी अटक केली.

 

आरोग्यविषयक वृत्त –

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

 

Loading...
You might also like