Baramati NCP MP Supriya Sule | दौंड तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योगांना भेट देण्यासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Baramati NCP MP Supriya Sule | दाैंड तालुक्यातील (Daund Taluka) अन्न प्रक्रियेशी संबंधित कृषी प्रक्रिया उद्योग आणि कोल्ड स्टोरेज उद्योगांना भेट देण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांना खासदार सुप्रिया सुळे (Baramati NCP MP Supriya Sule) यांनी आमंत्रित केले.
खासदार सुळे यांनी आज त्यांची भेट घेऊन निमंत्रीत केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha constituency) दौंड तालुक्यात (Daund Taluka) असलेल्या आर्या ग्रिनफिल्ड, टेस्टी बाईट्स, तन्वी कोल्ड स्टोअरेज व वेअरहाऊस आणि वसंत कोल्ड स्टोरेज या उद्योगांनी गुणवत्ता, उत्पादन, आणि पायाभूत सुविधा उभारणीत आपला ठसा उमटवला आहे. या उद्योगांना भेट देऊन पाहणी करावी, असे सुळे (Baramati NCP MP Supriya Sule) यांनी यावेळी त्यांना सांगितले.
पारस यांनी यावेळी त्यांचे निमंत्रण स्वीकारत सकारात्मक प्रतिसाद दिला. यासाठी खासदार सुळे यांनी त्यांचे आभार मानले.
Web Title : Eat to visit agro processing industries in Daund Taluk. Sule’s invitation to Union Ministers
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
ACB Trap On Police Havaldar | 25 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अॅन्टी करप्शनच्या जाळयात
Salman Khan | जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खानने दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाला….