Baramati News | बारामती तालुक्यात उद्यापासून कोरोना निर्बंधात वाढ, शनिवार-रविवार पूर्णपणे बंद

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) हळू हळू ओसरत आहे. परंतु पूर्णपणे ओसरली नसून जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. बारामती तालुक्यात (Baramati News) कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. बारामती शहरासह (Baramati News) तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी उद्यापासून (रविवार) निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. याशिवाय शनिवार आणि रविवार या दोन दिवशी वैद्यकीय अस्थापना सोडून सर्व अस्थापना बंद राहतील, असा निर्णय आज (शनिवार) स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे (Sub-Divisional Officer Dadasaheb Kamble) यांच्या अध्यक्षतेखाली आज बारामती तालुका पोलीस स्टेशन येथील सभागृहात बैठक पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Additional Superintendent of Police Milind Mohite), गट विकास अधिकारी राहुल काळोभोर, उप विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, महेश ढवाण, सिल्व्हर ज्युबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सर्व विभागांनी जबाबदारीने काम करावे

बैठकीत बोलताना उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले की, बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वच विभागांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. शहरात आणि ग्रामीण भागात अँटीजन टेस्टिंगमध्ये (antigen testing) वाढ करावी. गावात बाहेरुन येणाऱ्या लोकांची यादी करुन तपासणी करण्यात यावी. दुपारी 4 नंतर दुकाने सुरु राहिल्यास संबंधितावर कडक कारवाई करावी, अशा सूचना कांबळे यांनी दिल्या.

नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
प्रत्येक गावामध्ये कोरोनाच्या जनजागृतीसाठी दवंडी देऊन जनजागृती करावी.
लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांना परवानगी नसेल तर असे कार्यक्रम होऊ देऊ नयेत.
संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी. याशिवाय सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमावर लक्ष द्यावे.
नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे.
सर्व संबंधित विभागांनी जबाबदारीने व समन्वय साधून काम करावे,
असे आदेश उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले.

Web Titel :- Baramati News | restrictions increase in baramati taluka from tomorrow saturday sunday closed

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट