Baramati Police News | बारामती पोलिस उपमुख्यालयासाठी 300 पदे भरण्यास मंजूरी

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील (Baramati) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गृहविभागाने बारामतीनजीक (Baramati) मौजे बऱ्हाणपूर (Barhanpur) येथे पुणे जिल्हा पोलीस उपमुख्यालय (Pune District Police Sub Headquarter) निर्माण करण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. प्रस्तावित पोलीस उपमुख्यालयासाठी (Police Sub Headquarter) 287 नियमित पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली (approve filling 300 post) आहे. तसेच 13 पदे बाह्ययंत्रणेमार्फत घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

पुणे पोलिस (Pune Police) मुख्यालयातील ताण कमी करण्यासाठी आणि पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व दौंड या सारख्या तालुक्यात तातडीच्या प्रसंगी पोलिसांचा बंदोबस्त उपलब्ध व्हावा यासाठी बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पोलीस बंदोबस्त तात्काळ उपलब्ध व्हावा आणि कायदा सुव्यवस्थेची (Law and order) परिस्थिती अबाधित रहावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालयाची निर्मिती

बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालयाची निर्मिती करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. यानंतर या उपमुख्यालयाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी 300 पदांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिला होता. मुख्य सचिवांच्या बैठकीत हा प्रस्ताव नुकताच सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून आता 300 पदे भरण्यात येणार आहेत.

300 पदांच्या निर्मितीसाठी वित्त विभागाची मान्यता

पोलीस महासंचालकांच्या (DGP) प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर 287 नियमित पदे तर 13 पदे बाह्य यंत्रणेमार्फत आवश्यकतेनुसार निर्माण करण्यास वित्त विभागानेही मान्यता दिली आहे. वित्त विभागाची मान्याता मिळाल्यानंतर यासंदर्भातील पुढील कार्यवाही सुरु होणार आहे. पोलीस उपमुख्यालयाच्या निर्मितीमुळे दक्षिण पुणे जिल्ह्यासाठी या उपमुख्यालतून तातडीचा पोलीस बंदोस्त उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इंधन, वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.

Web Title : Baramati Police News | government approves filling of 300 posts for baramati police deputy headquarters

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 13,027 ‘कोरोना’मुक्त, 6,740 नवीन रुग्ण

Pune Crime Branch Police | दरोड्याच्या तयारीत असलेल्या बबन व्यवहारे याच्यासह चौघांना गुन्हे शाखेकडून अटक

12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्‍यांची खुर्ची मजबूत होणार ?
जाणून घ्या

SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर,
‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा