पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Pune Crime News | तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे राहणार्या मध्यप्रदेशातील महिलेला हॉटेलमध्ये काम देतो, असे सांगून पणदरे गावात आणले. तिला पत्र्याच्या खोलीत डांबून ठेवून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) करणार्या नराधमाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. (Rape Case)
पोपट धनसिंग खामगळ (वय २५, रा. खामगळवाडी, ता. बारामती) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. या पिडित महिलेला हॉटेल कामासाठी आलेल्या एका जोडप्यातील महिलेस आरोपीसोबत शारीरी संबंध ठेवण्यासाठी तयार करण्यास या पोपटने सांगितले होते. तिने त्याची मागणी पूर्ण न केल्याने तिला त्याने पुन्हा मारहाण केली होती. या महिलेच्या मोबाईलवरुन तिने आपल्यावरील आपबिती नातेवाईकांना सांगितल्याने या घटनेला वाचा फुटली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार १२ जानेवारी रोजी पणदरे येथे एका हॉटेलचे बांधकाम चालू होते. हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या खोल्यांची तपासणी पोलिसांनी केली. एका खोलीत ही पिडित महिला मिळून आली. तिला महिला अंमलदारांच्या मदतीने मानसिक आधार देऊन विचारपूस केली. तेव्हा तिने हकीकत सांगितली. ही महिला मुळ ची मध्य प्रदेशातील असून तिचे पती हे तळेगाव दाभाडे येथील कंपनीत काम करत होते. कंपनीतील काम सुटल्याने तो गावी गेला होता. पिडित महिला एकटीच तळेगाव दाभाडे येथे काही महिन्यांपासून राहत होती. तळेगाव दाभाडे येथे कंपनीत काम करणार्या मैत्रिणीकडून पोपट खामगळ याचे सोबत ओळख झाली. त्याचा हॉटेल व्यवसाय आहे, असे सांगण्यात आले. त्याने पिडितेस पणदरे येथील हॉटेलमध्ये काम देतो व १५ हजार रुपये पगार देण्यात येईल, असे सांगून बारामतीला बोलावले.
पणदरे येथील पोपट खामगळ याचे काम चालू असलेल्या हॉटेलवर २ जानेवारी रोजी नेले. तिला एका पत्र्याच्या खोलीत ठेवले. ३ जानेवारीला पहाटेच्या वेळी पिडित झोपली असताना पोपट खामगळ हा खोलीत आला व त्याने जबरदस्तीने पिडितेवर लैंगिक अत्याचार केला. कोणास काही एक सांगितले तर खुन करील, अशी धमकी दिली. तसेच तुझ्यावर वॉचर नेमलेले आहेत, पळून जाण्याचा प्रयत्न केला तर फिक्स खुन करील, अशी धमकी देत पोपट या पिडित महिलेला मारहाण करुन ११ जानेवारीपर्यंत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. दरम्यान, हॉटेल कामासाठी आलेल्या एका जोडप्यातील महिलेस आरोपीसोबत शारीरीक संबंध ठेवण्यासाठी तयार कर, असे पोपट याने पिडित महिलेला सांगितले होते. पिडित महिलेने त्याची मागणी पूर्ण न केल्याने तिला पुन्हा मारहाण करुन पत्र्याच्या खोलीमध्ये जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करुन डांबुन ठेवले. पिडित महिलेने जोडप्यातील महिलेच्या फोनवरुन तिचे नातेवाईकास फोन करुन सर्व झालेला प्रकार सांगितले. या प्रकारची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी या पिडित महिलेची सुटका केली. पोपट खामगळ याला माळेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी पोलीस अधीखक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, एलआयबीचे कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, देवा साळवे, पोलीस अंमलदार अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, अर्चना बनसोडे, गोदावरी केंद्र यांनी केली आहे़ माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खटावकर पुढील तपास करीत आहेत.