काय सांगता ! होय, बारामतीच्या चहावाल्याने थेट पंतप्रधानांना पाठवली 100 रूपयांची मनी ऑर्डर, म्हणाले – ‘मोदीजी दाढी करा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात दोन वेळा लॉकडाऊन करण्याची वेळ आली. यात व्यवसाय, रोजगार बुडाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या बारामतीतल्या (baramati) एका चहावाल्याने थेट पंतप्रधान नरेंद मोदी यांना 100 रुपयांची मनीऑर्डर पाठवत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. तसेच पंतप्रधान मोदी दाढी वाढवून फिरत आहेत. माझ्या कमाईतून मी 100 रुपये पाठवत असून त्यांनी दाढी करावी, असेही त्याने म्हटले आहे. तसेच मोदींना काहीतरी वाढवायचे असेल तर लोकांसाठी रोजगार वाढवावा. लोकांसाठी आरोग्य सुविधासह लसीकरण केंद्र वाढवावे. लोकांची समस्या सुटतील याची काळजी घ्यावी असेही त्याने म्हटले आहे.

अनिल मोरे असे या चहावाल्याचे नाव आहे (baramati) बारामती (baramati) शहरातील इंदापूर रस्त्यावर एका खासगी रुग्णालयासमोर मोरे चहाची टपरी चालवतात.
गेल्या दीड वर्षात लॉकडाऊन झाल्याने चरितार्थ चालवणे अवघड झाले आहे.
त्यामुळे नाराज होऊन त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच रजिस्टर पत्र पाठवून आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
याबाबत मोरे म्हणाले की, पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते असून आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे.
त्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही.
परंतु कोरोना संकटात लोकांच्या समस्या वाढत आहेत.
लोकांसाठी आरोग्यासह रोजगार वाढवावा, या मागण्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग स्वीकारल्याचे ते म्हणाले.
मोरे यांनी मनीऑर्डर सोबत एक पत्र पाठवून कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला 5 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पुढील लॉकडाउन लागू केल्यास एका कुटुंबासाठी 30 हजार द्यावे, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

 

PM मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंनी साधला निशाणा, म्हणाले…