Baramati To Jejuri Journey | बारामती-जेजुरी प्रवास 35 मिनिटांत होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Baramati To Jejuri Journey | बारामती ते जेजुरी (Baramati To Jejuri Journey) हे 50 किलोमीटरचे अंतर (Distance) आता अवघ्या 35 मिनिटात पार होणार आहे. हायब्रीड अन्युईटी (हॅम) योजनेअंतर्गत जेजुरी ते नीरा नरसिंगपूर (Jejuri to Nira Narsinghpur) या रस्त्याचे काम सुरु आहे. यामध्ये जेजुरी ते मोरगाव (Jejuri to Morgaon) हा टप्पा पूर्ण झाला असून आता मोरगाव ते का-हाटीपर्यंत (Morgaon to Ka-hati) रस्त्यावरील डांबरीकरणाचा शेवटचा थर टाकून पूर्ण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे (Anil Dhepe) यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.एच. खत्री कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. यांच्या मार्फत डांबरीकरणाचे उत्तम काम सुरु आहे. बारामती ते जेजुरी हा प्रवास आगामी काही दिवसामध्ये कमालीचा सुखकर होणार आहे. रात्रीच्या वेळेस अंधारामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने होणारे अपघात थर्मो प्लास्ट पट्टे आखल्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. (Baramati To Jejuri Journey)

दरम्यान, का-हाटी ते बारामती पर्यंतचे काम आगामी पंधरवड्यात संपणार असून त्या नंतर महिन्याभरात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि मधोमध थर्मोप्लास्टचे पांढरे पट्टे आखून त्यावर कॅटआईज (रिफेल्कटर असलेले लहान चौकोनी प्लॅस्टिकचे तुकडे) बसविले जाणार आहेत. त्याव्यतिरिक्त अवघड व तीव्र वळणावर गाडी रस्त्याच्या खाली जाऊ नये यासाठी संरक्षक जाळी देखील उभारली जाणार आहे.

Web Title : Baramati To Jejuri Journey | baramati jejuri distance can now be covered in 35 minutes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन