साधु-संतांच्या हस्ते यात्रेचं उद्घाटन, त्यानंतर मनोरंजनासाठी ललनांकडून ‘अश्‍लील’ नृत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील बारां नगरपालिकेने आयोजित केलेल्या प्रसिद्ध डोला यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली अश्लील नृत्यांचा कार्यक्रम होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी या उत्सवाला विरोध दर्शवला आहे. या उत्सवात आलेल्या लहान मुलांच्या तसेच महिलांच्या उपस्थित या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे.

मात्र नगरपरिषेदेचे सभापती कमल राठोड, आयुक्त मनोज मीना आणि महोत्सव अध्यक्ष रानू गोयल यांच्या वतीने यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दररोज हजारो नागरिक या यात्रेला भेट देत असतात. हजारो भाविक आणि श्रद्धाळू याठिकाणी येत असतात. या प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. एकीकडे साधू आणि संत महात्म्यांच्या हस्ते या यात्रेचे उदघाटन झाले असताना दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे अश्लील कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, या यात्रेत होणाऱ्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात विरोध करत असून नगरपरिषदेच्या विरोधात देखील नागरिकांनी आवाज उठवला आहे.

Visit – policenama.com 

You might also like