‘बेबी डॉल’ सनीचं भारताबद्दल मोठं विधान ! म्हणाली- ‘भारतात…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी (Sunny Leone) अनेकदा आपल्या हॉटनेसमुळं चर्चेत येताना दिसत असते. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिचा छंदच आहे. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. यावेळीही सनी चर्चेत आली आहे. परंतु याचं कारण तिचा बोल्डनेस किंवा हॉटनेस नसून काही वक्तव्ये आहेत. एका मुलाखतीत बोलताना सनीनं भारताबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

सनी तिचा पती आणि मुलांसोबत मुंबईमध्ये राहते. परंतु कधी कधी ती तिच्या लॉस एंजेलिसच्या घरीही जात असते. अशात तिला कुठं राहणं जास्त आवडतं याबाबत तिनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे. परदेशात राहण्यापेक्षा तिला भारतात रहायला जास्त आवडतं असं तिनं सांगितलं आहे.

मुलाखतीत सनीला विचारण्यात आलं की, तुला परदेशात राहायला जास्त आवडतं की, भारतात ? यावर बोलताना सनीनं मोठ्या खुबीनं उत्तर दिलं. सध्या तिनं दिलेलं उत्तर सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. तिनं भारताबद्दल जे प्रेम दाखवलं ते सर्वांनाच आवडलं आहे.

सनी म्हणाली, मला आता अमेरिकेतही राहायचं नाही. मला तिथं नकारात्मक वातावरण वाटतं. भारतात एक वेगळचं वातावरण आहे. मला भारतात राहायलाच जास्त आवडतं. प्रत्येक देशाच्या स्वत:च्या समस्या असतात. परंतु एकूणच भारत एक विलक्षण देश आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती हॉरर कॉमेडी सिनेमा कोका कोला, रंगीला, वीरमादेवी, हेलेन आणि कोटीगोब्बा 3 अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. हे सर्व सिनेमे साऊथ इंडस्ट्रीतील आहेत असं समजत आहे. याशिवीाय ती एमएक्स प्लेअरवरील बुलेट्स (Bullets) या वेब सीरिजमध्येही काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती.