झाड कोसळून BARC च्या एकाचा मृत्यू, दिवस भरात ३ जणांचा झाड पडून मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मान्सून सुरु होण्यापुर्वी झाड अंगावर कोसळून बीएआरसी( भाभा अटोमिक रिसर्च सेंटर)च्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील गोवंडीत शुक्रवारी सायंकाळी घडली. झाड पडून तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची घडली आहे.

नितीन विष्णू शिरवळकर असे मृत्यू झालेल्या सायंटिफिक असिस्टंटचे नाव आहे.

गोवंडीतील अणूशक्तीनगरमध्ये बीएआरसीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाले आहेत. विशेषम्हणजे ही झाडं मोठी आहेत. पावसाळ्यात झाडांचा मोठ्या प्रमाणावर धोका असतो.बीएआरसीने पत्र निहून झाडांची काळजी घेण्याबाबत महापालिकेला कळविले होते. नितीन शिरवळकर हे बीएआरसीच्या इलेक्ट्रीक विभागात सायंटिफिक असिस्टंट म्हणून काम करत होते.

दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या अंगावर एक झाड कोसळलं. त्यांना घटनेनंतर बीएआरसीच्या रुग्णालयात दाखळ करण्यात आले होते. त्यानंतर उपचार करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मात्र खासगी जागेवर झाड पडून अपघात झाल्यासत्याला आपण जबाबदार नाही असं म्हणत मुंबई महापालिकेने हात झटकले आहेत.

एकाच दिवशी तीन जणांचा मृत्यू

मालाडमध्ये झाडाची फांदी पडून शैलेश राठोड यांचा मृत्यू

अंधेरीत झाड कोसळून जखमी झालेल्या ४८ वर्षीय चालक अनिल नामदेव घोसळकर यांचा मृत्यू

तर गोवंडीत झाड कोसळून बीएआरसीतील नितीन शिरवळकर यांचा मृत्यू

आरोग्य विषयक वृत्त – 

‘इन्सेफेलाईटीस’चे थैमान, बिहारमध्ये ६६ मुलांचा मृत्यू

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

You might also like