TRP प्रकरणात BARC च्या माजी CEO पार्थो दासगुप्ता यांना अटक, आतापर्यंतची 15 वी अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीआरपी गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने आज 15 अटक केली आहे. विशेष तपास पथकाने बार्क (BARC) च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला (CEO) रायगडमध्ये अटक केली आहे. फेक टीआरपी प्रकरणातील ही 15 वी अटक असून त्याला शुक्रवारी (दि.25) न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. पार्थो दासगुप्ता असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

दासगुप्ता याला पुणे ग्रामीण मधील रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली आहे. कायदेशीर कारवाई नंतर त्यांना रात्री मुंबईत आणण्यात येणार आहे. भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC) ही संस्था भारतीय व प्रसारण मंत्रालय (MIB) तसेच भारतीय दूरसंचार नियमाक प्राधिकरण (TRAI) यांच्या अधिपत्याखाली काम करते.

BARC या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास 3 हजार बॅरोमीटर्स बसवले असून त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या कार्यक्रमांवर निरगाराणी ठेवली जाते. त्याद्वारे विविध चॅनेल्सना टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स म्हणजेच TRP आकडेवारी दिली जाते. BARC ने दिलेल्या रेटिंग्जनुसार जाहिरातदार प्रसारित कार्यक्रमांमध्ये जाहिराती देत असतात. टीआरपीमध्ये फेरफार करुन फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करुन टीआरपी वाढवल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.

फेक टीआरपी प्रकरणातील तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी भांदवी कलम 409, 420, 465,468,406,120 (ब), 201, 204, 212 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत याप्रकरणी 14 आरोपींना अटक करण्यात आली असून आज अटक करण्यात आलेली ही 15 वी अटक आहे.