‘या’ राज्यातील समाज कल्याण विभाग वाटत राहिला 1149 मृतांना ‘पेन्शन’, 70 लाख वाटल्यावर उघडले ‘डोळे’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात बरेलीमध्ये वृद्धावस्था पेंशन देण्याबाबत मोठी तथ्य समोर आली आहेत. येथे विभागाने 1149 मृत लोकांच्या नावे पेंशन देण्यात आली आहे. तक्रारीनंतर खुलासा झाला की सर्व मृतकांची पेंशन बंद करण्यात आली.

अंदाजानुसार समाज कल्याण विभागाने 1149 मृतकांना जवळपास 70 लाख रुपये पेंशन देण्यात आली आहे. अनेक महिन्यापर्यंत विभाग मृतकांना पेंशन देत आहे. या प्रकरणी सीडीओ सतेंद्र कुमार यांचे म्हणणे आहे की सर्वेक्षणादरम्यान जेव्हा कळाले की 1149 मृतकांच्या खात्यात पेंशन देण्यात येत होती, त्यानंतर तत्काळ त्यांच्या पेंशनवर रोख लावली आहे.

सीडीओनी सांगितले की जितक्या पेंशन योजना आहेत त्या वृद्धावस्था पेंशन असेल किंवा विधवा पेंशन सर्वांची वेळोवेळी समीक्षा केली जाते. प्रत्येक सहा महिन्याने वर्षभराने याचे सर्वेक्षण केले जाते. ज्यात काही लोकांचा मृत्यू झाला आहे किंवा त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. अशांचे नाव काढून टाकण्यात येते.

तपासात हे पुढे आले की ज्या मृतकांच्या खात्यात पेंशन पोहचली आहे त्यांनी ती काढूनही घेतली आहे. स्थानिक रहिवासी असलेल्या अशोक शर्मा यांनी सांगितले की त्यांनी सांगण्यात आले आहे की आता सर्व व्यवस्था ऑनलाइन झाली आहे. ज्यानंतर यादी जारी करण्यात आली परंतु या यादीत अनेक लोक असे आहेत जे मृतक आहेत, परंतु त्यांच्या खात्यात पेंशन दिली जात आहे आणि विशेष म्हणजे ती काढण्यात देखील येत आहे. परंतु जे पात्र आहेत ते अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/