लव्ह जिहाद ! हिंदू म्हणून मुलीला फसवलं, MMS बनवून ‘निकाह’नंतर सुरु केलं ‘ब्लॅकमेलिंग’

लखनऊ : वृत्तसंस्था – मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर तिचा छळ केल्याची घटना उत्तप्रदेशातील बरेली येथे समोर आली आहे. हा सर्व प्रकार लव्ह जिहादशी निगडित असल्याचे आता उघड झाले आहे. एका मुस्लिम मुलाने हिंदू युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास जबरदस्तीने भाग पडून तिच्याशी निकाह केला.

लग्नानंतर त्या युवकाने त्या मुलीचा छळ करण्यास सुरवात केली त्याने तिचे आयुष्य एकदम नरक करून टाकले. याबाबतची माहिती त्या युवतीने स्वतः पोलिसात दिली आहे. तिला होणाऱ्या रोजच्या त्रासासोबत तिने आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मुलाने आपला एम एम एस बनवला आणि आपल्याला धर्म बदलण्यास भाग पाडले असल्याची माहिती दिली आहे.

एम एम एस बनवून करत होता ब्लॅकमेल –
मोह्हमद अजहर पीडित तरुणीला मारहाण सुद्धा करत असे, अनेकदा तरुणीला गंभीर इजा सुद्धा झाली होती त्याहूनही घृणास्पद म्हणजे आरोपी तरुणीचा एम एम एस बनवून तिच्याकडे आपल्या मित्रांसोबत झोपण्याची मागणी करत असे तरुणीने यावर नकार दिला तर तिला मारहाणीचा सामोरे जावे लागत असे.

अजहर सहित इतर साधीदारावर एफ आय आर दाखल
या सर्व प्रकारात अजहर सहित रिक्की, विक्की, जिशान आणि आणखी एका विरोधात बारादरी ठाण्यात कलम 323, 506 आणि 376 डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीओ सीटी कुलदीप कुमार यांनी या बाबतची माहिती दिली आहे तसेच या ठिकाणाहून या आधीही लव्ह जिहादची प्रकरणे समोर आली आहेत.

आरोग्यविषयक वृत्त