स्मशानभुमीत मयत मुलीला पुरण्यासाठी गेले तिथं खड्डा खोदताना जमिनीत पुरलेली जिवंत दुसरी मुलगी आढळली

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आपल्या समाजात प्रचलित आहे. उत्तर प्रदेशात बरेलीमध्ये एका मृत मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यासाठी वडील गेले होते. तेथेच एक दुसरी मुलगी त्या बापाला मिळाली. बरेली मध्ये एक महिलाने वेळे आधीच एका मुलीला जन्म दिला, परंतू या नवजात मुलीने जन्मा आधीच जग सुडले होते. त्यामुळे कुटूंबात दुखाचे वातावरण होते. त्यानंतर त्या मुलीला घेऊन नातेवाईक स्मशानभूमीमध्ये दफन करण्यासाठी पोहचले आणि जसे की खड्डा खणला, तेथे त्यांना मातीत दुसरी नवजात मुलगी रडताना मिळाली.

मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून कुटूंबातील लोक घाबरले आणि पळत जाऊन स्मशान भूमीच्या चौकीदाराला घटना सांगितली. त्यानंतर चौकीदार हिम्मत करुन पुन्हा त्या खड्यापाशी पोहचले. तेव्हा त्याला देखील रडणाऱ्या मुलीचा आवाज आला.

खड्डा खणताना फावड्यामुळे मातीत असलेले मडके फुटले आणि त्यातून जीवंत मुलीचा आवाज आला. त्या मुलीला मडक्यात टाकून दफन करण्यात आले होते. दुखी कुटूंबाने हा चमत्कार समजून लगेचच त्या नवजात मुलीला त्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात पोहचवले. त्यानंतर कुटूंबाने आपल्या मृत नवजात मुलीला दफन केले.

घडलेली घटना पोलिसांना कळवण्यात आली, ज्यानंतर नवजात मुलीला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथून सांगण्यात आले की मुलीची तब्येत नाजूक आहे. जमिनीतून या मुलीला लोकांना बाहेर काढले यामुळे स्थानिक लोकांनी या मुलीचे नाव सीता असे ठेवले आहे.

पोलीस जीवंत मुलीला जमिनीत दफन करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की मुलीचे वजन खूपच कमी आहे आणि तिला रक्ताचे इन्फेक्शन झाले आहे. तिला ऑक्सिजन लावण्यात आले आहे. मुलगी जमिनीत मडक्यात असल्याची बातमी मिळाल्यानंतर बिथरी चैनपूरचे आमदार राजेश मिश्रा यांनी मुलीचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली.

Visit : Policenama.com