आता एन्डोस्कोपीद्वारे वजन कमी करता येणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आरोग्यकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. आणि फास्टफूडच्या जमान्यात आपले खाण्यावर कंट्रोल नाही. त्यामुळे वजनावरही कंट्रोल करणे खूप अवघड झाले आहे. आज वजन कमी करण्यासाठी जो उपचार माहित पडेल ते आपण करत आहोत. परंतु या काही उपचारातून आपल्या शरीराला हानी पोहचू शकते. पण आता शरीराला कोणतीही हानी न पोहचता एन्डोस्कोपीद्वारे वजन कमी करता येणार आहे.

या प्रक्रियेमुळे शरीराला कोणतीही इजा पोहचणार नाही. ज्यांना वजन कमी करण्याच्या इतर शस्त्रक्रियेची भीती वाटते. त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे. ईएसजी ही नॉन सर्जिकल प्रक्रिया आहे. एन्डोस्कोप या कॅमेरा असलेल्या लवचिक नळीने आणि त्याला जोडलेल्या एन्डोस्कोपीक टाके पाडण्याच्या उपकरणाने ही प्रक्रिया करतात. या सूक्ष्म कॅमेऱ्यामुळे डॉक्टर ही प्रक्रिया छिद्र पाडता करू शकतात. पोटात घातलेले टाके पोटाची रचना बदलतात. आणि शरीरात शोषल्या जाणाऱ्या कॅलरींवर कंट्रोल करतात.

या शस्र्क्रियेसाठी रुग्णाला जास्त दिवस रुग्णालयात ठेवले जात नाही. एका दिवसांनंतर लगेच त्याला डिस्चार्ज दिला जातो. आणि काही दिवसात रुग्ण लगेच बराही होतो. त्यामुळे हि अतिशय सामान्य प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत आपल्या वजनाच्या १५ ते २० टक्के वजन कमी होते. आणि हि प्रक्रिया अतिशय कमी खर्चिक आहे. त्यामुळे हि सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारी आहे.

‘एनलायटन’ हे बेरिऍट्रिक एन्डोस्कोपी केंद्रं पद्मश्री डॉ. अमित मायदेव आणि बेरिऍट्रिक सर्जन डॉ. मोहित भंडारी यांनी सुरू केलं आहे. या केंद्रात एन्डोस्कोपीक स्लीव्ह गॅस्ट्रोप्लास्टी (ईएसजी) केली जाणार आहे. या दोन्ही डॉक्टरांनी आजवर 157 एन्डोस्कोपीक स्लीव्ह गॅस्ट्रोप्लास्टी प्रक्रिया केल्या आहेत.रुग्णांना चांगला परिणाम देण्याचे त्यांचे ध्येय आहे.

फेसबुक पेज लाईक करा –