बार्शी जवळ प्रवेशद्वाराची कमान कोसळून 3 मजूर जागीच ठार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग जवळ तुळजापूर रस्त्यावर बावी ( आ ) येथे प्रवेशद्वाराची कमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन मजूर कामगार जागीच ठार झाल्याची दुर्घटना आज दुपारी 12 वाजता घडली आहे.

वैराग पासून जवळच असलेल्या बावी (आ) येथे प्रवेशद्वार कमानीचे काम सुरु होते हे काम खाजगी मालकीचे होते, हे काम सुरू असतानाच कमान कोसळली आणि कमानीच्या मटेरियल खाली दबून तीन मजूर कामगार जागीच ठार झाले आहेत,ही दुर्घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
ठार झालेल्या मजुरांमध्ये महेश भारत डोळज (वय २७ वर्षे, रा. वैराग) विकास सुग्रीव वाळके (वय, ३२ रा. मानेगाव) दिपक संग्राम घोलप (वय ३२ वर्षे रा. दडशिंगे) हे मरण पावले आहेत.

घटनास्थळी बार्शी तालुका पोलिसांनी भेट देवून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. संचारबंदिच्या काळात दरम्यान सगळीकडे लॉक डाऊन सुरू असताना खाजगी कमानीचे काम कसे सुरु होते? असा प्रश्न गावकऱ्यांनी आणि मृताच्या नातेवाईकानी केला असून मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईकाना आर्थिक मदत दिली जावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकानी घेतली असल्याची माहिती पोलीस नामा प्रतिनिधी महेश गायकवाड यांच्याशी बोलताना काही जणांनी दिली.

झालेल्या घटनेला जबाबदार कोन व बार्शी तालुका पोलिस यावर काय कारवाई करणार असे प्रश्न सध्या उपस्थित झाले असून, याकडे संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पुढील तपास बार्शी तालुका पोलिस करत आहेत.