Barshi News | बार्शी ही गुणवत्तेची खाण ! चंद्रकांत पाटील व सुभाष देशमुख यांचे गौरवोद्गार

बार्शी : पोलीसनामा ऑनलाइन – Barshi News | बार्शी ही सर्वच क्षेत्रातील गुणवत्तेची खाण असून इथल्या मातीत तयार झालेली माणसे विविध क्षेत्रात सातत्याने विश्वविक्रमी कामगिरी बजावत असल्याचे गौरवोद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील (BJP state president and former minister Chandrakant Patil ) व माजी मंत्री सुभाष देशमुख (former minister Subhash Deshmukh) यांनी येथै काढले. ज्येष्ठ संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने (Raja Mane, Senior Editor and Founder President of Digital Media Editors Journalists Association) यांच्या सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) बार्शी (Barshi News) येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख,आ. रणजितसिंह देशमुख (MLA RanjitSingh Deshmukh) यांनी सदिच्छा-संवाद भेट दिली.यावेळी राजा माने यांच्या प्रकाशनाच्या मार्गावर असलेल्या ” ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” या पुस्तकात ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे (Nitin Khilare) यांनी रेखाटलेल्या त्यांच्याच चित्रांची आकर्षक भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Barshi News | Barshi is a mine of quality! Praise of Chandrakant Patil and Subhash Deshmukh

कुबोटा या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ट्रॅक्टर्स ची सर्वाधिक विक्री करून जगात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे यांचा चंद्रकांत पाटील (BJP state president and former minister Chandrakant Patil ) व माजी मंत्री सुभाष देशमुख (former minister Subhash Deshmukh) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चित्रकार नितीन केदारे यांच्या चित्रकौशल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मातृभूमीचे मार्गदर्शक व उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट, मातृभूमीचे संचालक अजित कुंकूलोळ,प्रा.किरण गाडवे, कोरोनावरील “कॉकटेल” या उपचार पद्धतीचा राज्यात पाहिला प्रयोग करणारे डॉ. संजय अंधारे,माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले,रमेशअण्णा पाटील, बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव किरण देशमुख,तेजस राऊत, उद्योजक मुकु़द सोमाणी, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष अजय तथा टिंकू पाटील, डॉ.शुभम थळपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अविनाश बोल्ट यांनी आभार प्रदर्शनपर भाषणात आरोग्य सुविधा विषयी अपेक्षा व्यक्त केल्या.सौ.वर्षा झाडबुके-ठोंबरे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रकांतदादा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.माने परिवाराच्यावतीने डॉ.संतोष जोगदंड, विनायक माने, आंतरराष्ट्रीय टेनिसस्टार ऑलिंपिकपटू प्रार्थना ठोंबरे,सौ.शिल्पा राऊत,सौ.मंदा माने, अमित इंगोले,अक्षय दीक्षित,अमोल सावंत, मल्लिनाथ गाडवे,कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, डॉ.राहूल सामनगावकर, मुरलीधर चव्हाण, नवनाथनाना कसपटे,प्रा.विलास गुंड, सूर्यकांत वायकर, राजाभाऊ देशमुख, कमलेशभाई मेहता,अरुण पाटील महागावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी भाजपा नेते शहाजीभाऊ पवार, धैर्यशीलभैय्या मोहिते-पाटील, मोहन डांगरे, श्रीकांत देशमुख, महावीर कदम, अतुल दीक्षित तसेच औरंगाबादचे नामदेव खराडे हे आवर्जून उपस्थित होते.

हे देखील वाचा

Ration Card वर मिळतील अनेक फायदे, जर अजूनपर्यंत बनवले नसेल तर ‘या’ पध्दतीनं करा अर्ज, जाणून घ्या

Maharashtra Sadan Fire | दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही (Video)

Pune-Bangalore Highway | शुक्रवारपासून बंद असलेली पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक आज सुरु होण्याची शक्यता

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Barshi News | Barshi is a mine of quality! Praise of Chandrakant Patil and Subhash Deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update