सख्खा भाऊच निघाला पक्‍का वैरी, जमिनीच्या वादातून खून ; मयताचा मेहुणा, सख्खा भाऊ गजाआड

वैराग (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाइन – जमिनीच्या वादातून नऊ महिन्यापूर्वी बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा खून झाला होता. याप्रकरणी खून झालेल्या व्यक्तीच्या सख्ख्या भावाने वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणात मयताचा भाऊ आणि फिर्यादी हाच मुख्य आरोपी असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी फिर्यादी आणि मयताचा मेहुण्याला अटक केली आहे. हा प्रकार ४ सप्टेंबर २०१८ मध्ये तांबेवाडी शिवारात घडला होता.

अतुल साहेबराव मुंडे (वय-२७ रा. कामेगाव, ता.जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अतुलचा सख्खा भाऊ कुमोद साहेबराव मुंडे (वय-३० रा. कामेगाव, जि. उस्मानाबाद) आणि संतोष ढोकळे (रा. झरेगाव) यांना अटक केली आहे. आरोपींनी अतुल याचे हातपाय बांधून व गळा दाबून खून करुन मृतदेह टाकून दिला होता. याप्रकरणात कुमोद मुंडे याने वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

घटनेच्या दिवशी अतुल हा आईसोबत भातंबरे येथे मावशीकडे आला होता. रात्री आठच्या सुमारास आरोपी भातंबरे येथे आले. त्याला दुचाकीवर बसवून तांबेवाडी शिवारात घेऊन गेले. त्याठिकाणी अतुलाचे हातपाय बाधून त्याचा गळा आवळून खून केला. आरोपी कुमोद आणि मयत अतुल यांच्यामध्ये जमिनीच्या वादातून वाद होते. तसेच अतुलने कुमोदच्या पत्नीसोबत छडछाड केल्याचा राग कुमोदच्या मनात होता. यातूनच अतूलचा खून करण्यात आला होता.

सदर गुन्हाचा तपास मा. पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर, पोलिस नाईक दयानंद हेंबाडे, महेश पवार, पोलिस कॉन्स्टेबल अजय बुरले, योगेश खलाटे यांनी केला.

आरोग्य विषयक वृत्त – 

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

केसांच्या समस्या समूळ नष्ट करा ; ‘हे’ आहेत उपाय

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत ? घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक