Barsu Refinery Project | बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांचे चर्चेचे आवाहन, मात्र ग्रामस्थांनी फिरवली पाठ

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – रिफायनरी विरोधात बारसूमध्ये (Barsu Refinery Project) सुरु असलेले आंदोलन आज चिघळले. पोलिसांनी रिफायनरीच्या माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. त्याशिवाय, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना (Barsu Refinery Project) चर्चेचे आवाहन केले. परंतु ग्रामस्थांनी याला विरोधकरत पाठ फिरवली.

दरम्यान, रिफायनरी विरोधात बारसूमध्ये सुरु असलेले आंदोलन आता तीन दिवसांसाठी स्थगित केल्याची घोषणा
स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्याचबरोबर जर तीन दिवसांत माती परीक्षण (Soil Test) थांबले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली.

आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी (Collector) त्याठिकाणी आले होते.
मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस काह घोषणा होत नसल्याने आंदोलक त्यांच्या समोरून निघून गेले.
राजापूरमध्ये देखील दोन तास संवाद साधला होता. प्रशासन तुमच्या सोबत आहे, समस्यांवर मार्ग निघू शकतो.
प्रतिनिधींची नावे द्या, आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधू असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलणं थांबवलं.

माती परीक्षण तीन दिवसांत थाबवा. तीन दिवसांत माती परीक्षण थांबले नाही तर पुन्हा आंदोलन सुरु होईल.
तीन दिवसांत पुन्हा चर्चा झाली नाही तर आंदोलन करणार असे स्थानिक नेते काशिनाथ गोरले (Kashinath Gorle)
यांनी सांगितले.

Web Title :-  Barsu Refinery Project | protest in barsu refinery project suspended for three days protestors left in front of district collector of ratnagiri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Prisons Department News | राज्य कारागृह विभागातील 49 अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर ! अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची घोषणा

Pune BJP Jagdish Mulik On Congress Mallikarjun Kharge | भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे काँग्रेसवर शरसंधान; म्हणाले – ‘गांधी कुटुंबाचे पोपट बोलू लागले’