BARTI Pune | ‘महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – BARTI Pune | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ‘महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी विविध भाषेतील साहित्यकारांनी त्यांचे काव्यरूपातील साहित्य ३१ मे पर्यंत पाठविण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.(BARTI Pune)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव ज्याप्रमाणे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रावर पडला तसाच तो साहित्य क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर पडला. प्रारंभिक काळात राज्यातील साहित्यिकांनी कविता, कथा, नाटक, आत्मचरित्र इत्यादी लेखन प्रकारातून विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली आहे. त्याचबरोबर इतर भाषिक राज्यातही विविध भाषा तसेच बोलीभाषेमध्ये देखील अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली आहे. हे विचार जनसामान्य माणसापर्यंत पोहचविण्यात कवी, गायक, शाहीर, साहित्यिक, कलावंतांचे मोठे योगदान आहे.

या सर्वांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांनी लिहिलेल्या कविता, गझल, अभंग, अखंड, ओवी, छक्कड, शाहिरी, रुबाया, हायकू,
चारोळी, भारुड, पोवाडा, लोकगीते इत्यादी सर्व काव्यप्रकार मोठ्या प्रमाणावर संकलन व एकत्रित करून
‘महामानव विश्वकाव्य दर्शन’ हा काव्यसंग्रह संपादित करून ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे प्रस्तावित आहे.

त्यासाठी साहित्यकारांनी विविध भाषेतील काव्य निर्माण केलेले असल्यास त्याची प्रत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन
आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८ क्वीन्स गार्डन, पुणे ४११००१ या पत्यावर किंवा [email protected] या
ई-मेलवर किंवा ९४०४९९९४५२ व्हॉट्सअॅप क्रमांकावर ३१ मे पर्यंत पाठवावी.
या कविता साहित्यिकाच्या नावाने प्रसिद्ध करण्यात येईल. सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही बार्टीमार्फत करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sunanda Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होईल, सुनंदा पवार यांचा मोठा दावा

Devendra Fadnavis On Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावरून फडणवीसांची पवारांवर टीका, 542 पैकी 10 जागा लढवणाऱ्यांच्या आश्वासनांवर विश्वास कोण ठेवणार

Ajit Pawar Break Traffic Rules In Pune | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तोडले वाहतुकीचे नियम, ताफा उलट्या दिशेने सुसाट, वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका (Video)

Ravindra Dhangekar On BJP | भाजपचाच देशभरातील महिलांच्या ‘मंगळसूत्रा’वर डोळा ! काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे भाजपवर टीकास्त्र