BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  BARTI Pune | डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे संस्थेच्यावतीने बार्टीचे महासंचालक सुनील वारे (Sunil Ware) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती (Ambedkar Jayanti) विविध उपक्रमाद्वारे संपूर्ण राज्यभर साजरी करण्यात आली. (BARTI Pune) चैत्यभूमी दादर मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे (Sumant Bhange), बार्टीचे महासंचालक वारे, विभागप्रमुख अनिल कांरडे, यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. (BARTI Pune)

 

बार्टी मुख्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व पुणे स्टेशन परिसरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास श्रीमती इंदिरा अस्वार निबंधक बार्टी, विभागप्रमुख श्रीमती स्नेहल भोसले, डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, वृषाली शिंदे, रवींद्र कदम, लेखाधिकारी राजेंद्र बरकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बार्टी मुख्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन पर्यंत समता रॅली काढण्यात आली या रॅलीत संविधान रथ व बार्टी संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. समता रॅलीत संविधानाचा गजर करण्यात आला.

 

ज्येष्ठ साहित्यिक अॕड. संभाजीराव मोहिते यावेळी म्हणाले, शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वतेची चमक ओळखून त्यांचा मुंबईतील घरी स्वतः जाऊन सन्मान केला तसेच माणगाव परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच उपेक्षित वंचित समूहाला न्याय देतील असे भाष्य करून तेच तुमचा उद्धार करतील अशी गर्जना केली. सामाजिक न्याय विभाग तसेच बार्टीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत काम करावे, असेही ॲड. मोहिते म्हणाले.

 

प्रस्ताविकात विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी जातीय व्यवस्थेतेविरुद्ध लढा दिला. संपूर्ण जगाने डॉ.
बाबासाहेबांच्या विद्वतेला वंदन केले असून त्यांचा विचार हा मानवतेच्या कल्याणासाठी असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले.
संविधानाची प्रत भेट देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. गजलगायक अशोक गायकवाड यांच्या चमूने भीम गीतातून महामानवास अभिवादन केले. सूत्रसंचालन रामदास लोखंडे यांनी केले.

 

यावेळी प्रकल्प अधिकारी संध्या गायकवाड, कार्यालयीन अधिक्षक डॉ. संध्या नारखडे, रितेश गोडाणे, सुभेदार सचिन जगदाळे,
प्रज्ञा मोहिते, लेखाधिकारी राजेंद्र बरकडे, प्रकल्प व्यवस्थापक डॉ प्रेम हनवते, डॉ सारिका थोरात, शुभांगी सुतार , महेश गवई, डॉ पायल डोके,
सहायक प्रकल्प व्यवस्थापक नरेश गोटे आदींसह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title :-  BARTI Pune | Through various activities on behalf of the Barti Institute,
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Celebration

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Shivtare On Ajit Pawar | अजित पवार भाजपमध्ये येणार हे कोणाला आवडणार नाही, त्यांनी शिवसेनेत यावं;
विजय शिवतारेंचे खुलं आमंत्रण

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME) | पुणे : प्रधानमंत्री सूक्ष्म
अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र अग्रेसर ! देशात सर्वाधिक 6 हजार 592 वैयक्तिक प्रकल्पांना मंजुरी