Basavaraj Bommai | आम्हाला सीमाभागात शांतता हवी आहे; पण… – बसवराज बोम्मई

बंगळुरू : वृत्तसंस्था – Basavaraj Bommai | महाराष्ट्रातून गेलेल्या 6 ट्रकवर कर्नाटकात कन्नड वेदिके रक्षणच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक केली. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न नव्याने पेटला आहे. या घटनेचे पडसाद पुण्यात उमटले. स्वारगेट बस स्थानकात कर्नाटकच्या गाड्यांना काळे फासण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी दोघांत शांतता प्रस्थापित करणाऱ्यावर बोलणे झाले. (Basavaraj Bommai)

बसवराज बोम्मई यांनी या चर्चेनंतर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. बोम्मई लिहितात, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझी फोनवर चर्चा झाली. यावेळी दोनही राज्यांत शांतता, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली आणि आमच्यात एकमत झाले आहे. तसेच दोनही राज्यांतील जनतेमध्ये सुरुवातीपासूनच प्रेम आणि बंधुत्वाची भावना राहिली आहे. दोनही राज्यांतील लोकांचे आपापसांत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आमच्यात कर्नाटकच्या सीमाप्रश्नावरून कोणतेही दुमत नाही. आम्ही कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात लढणार आहोत. (Basavaraj Bommai)

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील सीमावादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. संसदेत ठाकरे गटाचे खासदार आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.
शिंदे गटाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सीमाप्रश्नाप्रकरणी भेटीची मागणी केली आहे.
यावेळी ते कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात तक्रार करणार आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि अमित शहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात मध्यस्थी करणार का, हे पाहावे लागेल.

Web Title :-  Basavaraj Bommai | maharashtra karnataka border issue cm eknath shinde talk with karnataka cm basavaraj bommai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SC On Demonetisation | सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार न्यायालयाला; सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि आरबीआयला फटकारले

Petrol-Diesel Prices | ‘केंद्र सरकार दर 15 दिवसांनी कच्च्या तेलांच्या किमतीचा घेणार आढावा’ – निर्मला सीतारामन