Basavaraj S Bommai | बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

बेंगळुरू : वृत्त संस्था Basavaraj S Bommai | बीएस येदियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी सोमवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. अखेर कर्नाटक राज्याला आज नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत. बेंगळुरूमध्ये भाजप आमदारांच्या बैठकीत बसवराज बोम्मई (Basavaraj S Bommai) यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. सर्वप्रथम केंद्रीय मंत्र्यांनी कर्नाटकातील नेत्यांशी बैठकीत चर्चा केली होती.

 

 

तत्कालीन मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा (BS Yediyurappa) केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी (g. kishan reddy) आणि धमेंद्र प्रधान (Dhamendra Pradhan) यांच्यासोबत हॉटेलमध्ये पोहचले. तिथे आमदाराची बैठक झाली. बैठकीत बसवराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत अग्रेसर असणार्‍या बसवराज बोम्मई (Basavaraj S Bommai) यांनी धमेंद्र प्रधान यांची भेट घेऊन चर्चा केली होती. कर्नाटकचे मंत्री बसवराज बोम्मई आणि जगदीश शेट्टार यांनी आज सायंकाळी बेंगळुरूमध्ये राज्यातील भाजप पर्यवेक्षक आणि केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान आणि जी किशन रेड्डी यांची भेट घेतली होती.

 

 

सायंकाळी साडेसात वाजता आमदारांच्या बैठकीपुर्वी बसवराज बोम्मई यांनी कुमारा क्रुपा गेस्ट हाऊसमध्ये केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान, किशन रेड्डी आणि अरूण सिंह यांची भेट घेतली. त्यामध्ये भाजप नेता रेणुकाचार्य आणि डॉक्टर के सुधार यांनी भाजपचे प्रदेश प्रभारी अरूण सिंह यांच्यासोबत चर्चा केली. बीएस येदियुरप्पा हे मुख्यमंत्री होताना देखील रेणुकाचार्य हे एक मंत्रालय मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. दरम्यान, डॉक्टर के सुधाकर हे असे नेता आहेत की ज्यांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे.

 

Web Titel : basavaraj s bommai to be the next cm of karnataka announces dharmendra pradhan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम : महापौर मुरलीधर मोहोळ

Governor Bhagat Singh Koshyari | अवघ्या अर्ध्या तासात राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनी आटोपला चिपळूण दौरा; परत मुंबईला रवाना

Mamata Banerjee And PM Modi | ‘पश्चिम बंगालचं नाव बदला’ ! ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट