कौतुकास्पद ! महान बास्केटबॉल खेळाडू मायकेल जॉर्डन देणार 755 कोटींची देणगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दिग्गज बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डन आणि जॉर्डन ब्रँड यांनी जातीय समानता आणि सामाजिक न्यायाला चालना देणार्‍या संस्थांना 10 कोटी डॉलर्स (सुमारे 755 कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर संयुक्त निवेदनात जॉर्डन आणि जॉर्डन ब्रँड म्हणाले की, हे पैसे येत्या दहा वर्षांत देण्यात येतील आणि याचे लक्ष्य जातीय समानता, सामाजिक न्यायाला चालना देणे आणि शिक्षणास सुलभ बनविणे आहे. ‘

यात म्हंटले कि, ‘हे वादग्रस्त विधान नाही. जोपर्यंत वंशवाद संपत नाही, तोपर्यंत आम्ही कृष्णवर्णीय लोकांच्या जीवनात सुधारणा आणि संरक्षण करण्यासाठी कार्य करत राहू. ‘ जॉर्डनने सोमवारी जॉर्ज फ्लॉयड आणि कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसांकडून हत्येप्रकरणी निवेदन दिले. तो म्हणाला कि, ‘मी खूप दु: खी,आणि रागावलेलो आहे. मी प्रत्येकाच्या वेदना आणि असंतोष समजू शकतो. कृष्णवर्णीय लोकांविरूद्ध हिंसाचार आणि वंशभेदाचा निषेध करणाऱ्यांसोबत मी उभा आहे. आता हे खूप झाले. ‘