आश्चर्यजनक ! ‘उत्तेजक’ चाचणी दरम्यान बास्केटबॉल खेळाडू निघाला चक्क ‘गरोदर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील एका व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडूने असा काही पराक्रम केला कि त्याच्यावर थेट खेळण्यासाठी बंदीच घालण्यात आली. या खेळाडूने उत्तेजक चाचणीत दोषी आढळू नये म्हणून चक्क आपल्या मैत्रिणीच्या मूत्राचा नमुना चाचणीसाठी दिला. मात्र यामुळे तो वाचण्याऐवजी आणखीनच संकटात सापडला. या केलेल्या फसवणुकीमुळे त्याच्यावर थेट दोन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

व्यवसायिक बास्केटबॉल खेळाडू असलेला डी. जे. कूपर याने मागीलवर्षी उत्तेजक चाचणी करताना आपण दोषी आढळू नये म्हणून आपल्या मैत्रिणीचा मूत्र नमुना दिला. मात्र यामध्ये तो दोषी आढळला नाही मात्र तो गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राष्ट्रीय संघातून खेळण्याची त्याची संधी गेली. त्याचबरोबर मैत्रिणीचे मूत्र नमुना म्हणून देऊन फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई केली असून त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यावर २०२० पर्यंत म्हणजेच पुढील वर्षापर्यंत बंदी घालण्यात आली असून त्याला या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर त्याला ट्रोल करताना त्याच्या फोटोसोबत गरोदर असे लिहून लोकं त्याची खिल्ली उडवत आहेत. मात्र आपली मैत्रिणीमुळे फसलेल्या या खेळाडूला आपली मैत्रीण त्यावेळी प्रेग्नेंन्ट असेल हे देखील माहित नसणार. त्यामुळे अशा प्रकारे क्रीडा संघटनेला फसवू पाहणाऱ्या या खेळाडूला चांगलाच दणका बसला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –