Basmati Rice | यंदाच्या वर्षी नॉन बासमती तांदळाचे विक्रमी उत्पादन, निर्यात वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपला भारत देश अनेक वर्षांपासून जगातील बहुतांश देशांमध्ये बासमती तांदूळ (Basmati Rice) पाठविण्यासाठी किंवा निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय बासमती तांदूळ (Basmati Rice) जगभर प्रसिद्ध असल्यामुळे काही देशांनी बासमती तांदळाचा पेटंट (Patent) घेण्यासाठी पण प्रयत्न केले. परंतू ते यशस्वी झाले नाही. गेल्या बऱ्याच वर्षांपासून भारतातून 45 ते 50 लाख टन बासमती तांदूळ जगभरात निर्यात (Export) होतो. ह्या निर्यातीतून देशाला साधारणपणे 30 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन (Foreign Currency) प्राप्त होते. ह्यावर्षी सुद्धा जगभरात 45 ते 50 लाख टन भारतीय बासमती तांदूळ निर्यात होणार आहे.

 

परंतु आजचा सर्वात महत्वाचा विषय हा नॉन बासमती तांदळाच्या (Non Basmati Rice) निर्यातीबाबत आहे.
दहा वर्षांपूर्वी भारतातून फक्त बासमती तांदळाची निर्यात होत होती.
नॉन बासमती तांदूळ देशातून बाहेर पाठविण्यावर बंदी होती. कारण देशातील तांदळाचे उत्पादन आणि देशांतर्गत असलेली तांदळाची मागणी ही सम समान होती त्यामुळे भारतातून नॉन बासमती तांदळाची निर्यात होत नव्हती.
सन 2011 – 12 मध्ये भारत देशात तांदूळ निर्याती बद्दलचा सर्वात महत्वाचा निर्णय झाला.
आणि तत्कालीन सरकारने नॉन बासमती तांदळाला काही बंधनांवर परदेशात निर्यात करण्याची परवानगी दिली.
सुरवातीच्या वर्षात देशातून 40 लाख टन नॉन बासमती तांदळाची निर्यात झाली.
आणि त्याचे मूल्य होते मात्र 9 हजार कोटी रुपये. पुढे परिस्थिती बदलत गेली आणि दहा वर्षांनंतर देशाचे तांदळाचे उत्पादन 1000 लाख टनांवरून 1220 लाख टन पर्यंत पोहोचले आहे.
उत्पादन जसे जसे वाढत गेले तसे तसे नॉन बासमती तांदळाची निर्यात पण वाढली.

गेल्या वर्षी म्हणजे 2020 – 21 मध्ये आपण 130 लाख टन नॉन बासमती तांदूळ जगभरात निर्यात करून आजपर्यंतचा सर्वाधिक निर्यातीचा विक्रम साधला होता.
साधारण 35 हजार कोटी रुपयांचा नॉन बासमती तांदूळ गेल्या वर्षी भारतातून परदेशात गेला होता.
गेल्या वर्षी जगभरात कोविडची (Corona) परिस्थिती असतांना आपल्या देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे आपण जगभरात मोठ्या प्रमाणावर नॉन बासमती तांदूळ पाठवू शकलो.
अशी माहिती जयराज ग्रुपचे संचालक (Director of Jayaraj Group) व तांदळाचे निर्यातदार राजेश शहा (Rajesh Shah) यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, ‘माझ्या मते ह्यावर्षी आपण गेल्या वर्षी पेक्षा सुद्धा अधीक मोठ्या आणि विक्रमी प्रमाणावर नॉन बासमती तांदूळ जगभरात पाठवणार’.
ह्यावर्षी 2021 – 22 या आर्थिक वर्षा मध्ये आपल्या देशात तांदळाचे उत्पादन 1220 लाख टन झाले आहे.
ते ही विक्रमी उत्पादन (Record Production) आपल्या देशातील शेतकऱ्यांनी घेतले आहे.
ह्यावर्षी नॉन बासमती तांदळाची निर्यात 170 लाख टन पर्यंत होईल असा अंदाज आहे.

 

ह्यावर्षी चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर 2021 पर्यंत 125 लाख टन नॉन बासमती तांदूळ देशातून निर्यात झाला आहे. ह्यावर्षी चीन (China) व बांगलादेश (Bangladesh) मध्ये नॉन बासमती तांदळाची विक्रमी निर्यात झाली आहे.
डिसेंबर पर्यंत एकट्या बांगलादेश मध्ये सुमारे 16 लाख टन नॉन बासमती तांदूळ निर्यात झाला आहे.
तर चीन मध्ये याच कालावधीत 10 लाख टन नॉन बासमती तांदूळ निर्यात झाला आहे.
या शिवाय प्रामुख्याने नेपाळ (Nepal), श्रीलंका (Sri Lanka), व्हिएतनाम (Vietnam), सेनेगल (Senegal), सोमालिया (Somalia), इंडोनेशिया (Indonesia), मलेशिया (Malaysia), सौदी अरेबिया (Saudi Arabia), UAE, अमेरिका आणि युरोपीय देश (European Countries) हे आपल्या नॉन बासमती तांदळाचे खरेदीदार आहेत.
गेल्या वर्षीच्या 2020 – 21 मधील नॉन बासमतीची 130 लाख टन निर्यात व त्याचे मूल्य 35 कोटी रुपये त्याच्या तुलनेत ह्यावर्षी सुमारे 170 लाख टन नॉन बासमती तांदळाची निर्यात होईल व त्याचे मूल्य 45 हजार कोटी रुपये असेल असा अंदाज आहे.

नॉन बासमती तांदळामध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून काही प्रमुख जाती उदारणार्थ सुगंधी आंबेमोहोर (Sugandhi Ambemohor),
इंद्रायणी (Indrayani), सोना मसुरी (Sona Mussoorie), सुरती कोलम (Surati Kolam) इत्यादी तांदळाच्या प्रकारांना परदेशातून विशेष मागणी वाढत चालली आहे.
तांदळाच्या निर्याती मधून देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होत आहे.
असे मत जयराज ग्रुपचे संचालक व तांदळाचे निर्यातदार राजेश शहा यांनी व्यक्त केले.

 

Web Title :- Basmati Rice | Record production and export of non basmati rice
will increase this year

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा