नदीत ‘रोईंग बोट’ सारखं पोहताना दिसलं ‘वटवाघूळ’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –आजकाल लोक वटवाघुळाचे नाव घेताच घाबरू लागले आहेत. कारण कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे आणि असे म्हटले जात आहे की हा विषाणू वटवाघुळामधून इतर प्राण्याकडे आणि नंतर मानवामध्ये आला. परंतु सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यातील वटवाघूळाला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक वटवाघूळ नदीत पोहताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विट केला आहे. आपण प्राणी आणि प्राण्यांचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील, परंतु अद्यापपर्यंत असा व्हिडिओ पाहिला नसेल. हा व्हिडीओ ट्वीट करत आयएफएस सुशांत नंदा यांनी लिहिले आहे की, हा एकमेव सस्तन प्राणी आहे जो उडतो देखील आणि पोहतोही. तेही रोइंग बोटसारखा.

 

 

 

वटवाघूळ हे एक चांगले जलतरणपटू असतात. ते त्यांच्या पंखांचा वापर पोहण्यासाठी उत्तम प्रकारे करतात. ट्विटरवर १४ सेकंदाचा हा व्हिडिओ चांगलाच पसंत केला जात आहे. हा व्हिडिओ सुशांत नंदा यांनी २७ मार्च रोजी सकाळी शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत ५५०० पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. ५०० हून अधिक लाइक्स आणि सुमारे ११२ लोकांनी री-ट्वीट केले आहे.