Bath During Periods | तुम्हाला मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Bath During Periods | महिलांना त्यांच्या मासिक पाळीमध्ये (Menstrual Cycle) अनेक अडचणींना (Bath During Periods) सामोरे जावे लागते. तसेच मासिक पाळीत अनेक महिलांना पोट दुखी (Abdominal Pain), पाठ दुखी (Back Pain ), कंबर दुखी तसेच शारीरिक दुखणं अशा अनेक अडचणींना तोंड द्याव लागतं. इतकंच नव्हे तर अनेक महिलांचे मासिक पाळीच्या (Women’s Special Periods Care Tips) वेळात मूड स्विंग्स् सुद्धा होत असतात.

 

कित्येक महिला मासिक पाळी दरम्यान होत असणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात. अनेक महिला योगा करून आपलं दुखणं कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु अशावेळी महिलांनी आंघोळीची देखील काळजी घेतली पाहिजे. जाणून घेऊयात मासिक पाळीत आंघोळ करण्याची योग्य पद्धत (Bath During Periods) कशी असते.

 

महिलांनी मासिक पाळीच्या दरम्यान आंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते ;

 

• पॅड, सॅनिटरी नॅपकिन किंवा कप काढणे :
महिलांनी आपल्या मासिक पाळीच्या वेळी आंघोळ करताना पॅड (Pad), सॅनिटरी नॅपकिन (Sanitory Napkin) किंवा कप (Cup) काढून ठेवले पाहिजे. तसेच महिलांनी आपल्या प्रायव्हेट पार्टची जागा व्यवस्थित स्वच्छ केली पाहिजे, अन्यथा त्या जागी इन्फेक्शन (Private Part Infection) होण्याची शक्यता दाट असते.

 

• दोनदा अंघोळ करणे :
अभ्यासानुसार मासिक पाळीमध्ये महिलांनी दिवसातून दोन वेळा आंघोळ (Bath) केली पाहिजे. मात्र आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे. जर कोणी थंड पाण्याने अंघोळ केली तर, शरीराचे तापमान (Body Temperature) कमी होते. त्यामुळे त्याचा परिणाम रक्तस्राव चक्रावर (Bleeding Cervical) होतो. तसेच उन्हाळ्यात देखील कोमट पाण्यानं आंघोळ करावी.

• बाथटब वापरताना काळजी घ्यावी :
मासिक पाळीत (Menstrual Cycle) बाथटबमध्ये आंघोळ करत असाल तर, आंघोळीपूर्वी तो बाथटब व्यवस्थितपणे स्वच्छ केला पाहिजे.

 

• केमिकल उत्पादनाचा वापर टाळणे :
मासिक पाळीमध्ये प्रायव्हेट पार्ट (Private Part) स्वच्छ करत असताना तेथे केमिकल उत्पादनाचा (Chemical Products) वापर करण्याचं टाळावं.
अन्यथा तुम्हाला एलर्जी किंवा चिडचिड होण्याची शक्यता आहे.

 

• प्रायव्हेट पार्ट कोरडा ठेवणे :
आंघोळ केल्यानंतर महिलांनी प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे कोरडा करायला हवा. कोरडा न केल्यास, ओलेपणामुळे महिलांना अनेक समस्या उद्भवू शकतात.
त्यामुळे नेहमीच महिलांनी कॉटनची अंडरवेअर (Cotton Underwear) वापरणं सोयीस्कर आहे.

 

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Bath During Periods | bath during periods what is the right way to bath during menstrual cycle marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

 

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

 

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’