Bathing With Salt Water | सांधेदुखीचा त्रास होत आहे का?; मग आंघोळीच्या पाण्यात ‘ही’ गोष्ट मिसळा होईल फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bathing With Salt Water | आपले आरोग्य ठणठणीत अथवा फ्रेश राखण्यासाठी लक्ष देणे अधिक महत्वाचे असते. खरंतर खाण्यापिण्यावरही नियंत्रण मिळवणे आवश्यक असते. दरम्यान, बदलत्या हवामानामुळे लोक गरम किंवा थंड पाण्याने आंघोळ (Bathing) करत असतात. मात्र आंघोळ करताना एक महत्वाचा फायदा तुमच्यासमोर आणला आहे. आंघोळ करताना पाण्यात मीठ मिसळून केल्याने अनेक समस्यापासून आपण लांब राहतो. आंघोळीच्या पाण्यात मीठ घातल्याने सांधेदुखीला (Joint Pain) आराम मिळतो. त्याचबरोबर ताणतणाव कमी होतो. त्यामुळे आंघोळ करत असताना मीठाचा समावेश केल्याने फायदा (Bathing With Salt Water) काय होईल याबाबत जाणून घ्या.

 

1. सांधेदुखी कमी होते (Joint Pain Is Reduced) –
मीठ पाण्याने सांधेदुखीचा त्रास कमी होते. आंघोळ करताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकलं तर हाडांच्या दुखापती अशाच दूर होतात. याशिवाय जर तुमच्या पायात खूप वेदना होत असतील तर कोमट मिठाच्या पाण्याने पाय धुतल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. (Bathing With Salt Water)

 

2. इन्फेक्शन कमी होतं (Infections Are Reduced) –
कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन दूर करण्यासाठी मीठाचं पाणी खूप उपयुक्त आहे.
वास्तविक, मिठात असलेलं खनिजं अनेक प्रकारच्या संक्रमणांपासूनही संरक्षण करतात.
मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील सर्व छिद्रे उघडतात आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

3. तणाव कमी होतो (Reduces Stress) –
जर तुम्हालाही अधिक ताणतणाव जाणवत असेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात मीठ घालून अंघोळ करा.
यामुळे ताण कमी होण्यास फायदा मिळेल. मिठाच्या पाण्यात असलेली खनिजं शरीरात शोषली जातात. त्यामुळे ताण कमी होण्यास फायदा मिळतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Bathing With Salt Water | bathing with salt water know about the benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Actress Prema Kiran Passed Away | ‘धुमधुडाका’, ‘दे दणादण’ सह अनेक मराठी चित्रपट गाजविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे 61 व्या वर्षी निधन !

 

LPG Cylinder Price 1 May 2022 | एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांपेक्षा जास्त वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 

Kishori Pednekar on Raj Thackeray | ‘…म्हणून राज ठाकरे हिंदुत्वाचं कार्ड चालवत आहेत’; किशोरी पेडणेकरांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र