‘बाटला हाऊस’ की ‘मिशन मंगल’, कोण ‘बाजी’ मारणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सत्य घटनेवर आधारित जॉन अब्राहमचा बाटला हाऊस आणि अक्षय कुमारचा मिशन मंगल एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. दोन्ही चित्रपटापैकी प्रेक्षकांची पसंती कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक मिळते हे पाहणे औत्युक्याचे राहणार आहे. मात्र चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांच्या मते अक्षय कुमारच्या मिशन मंगलला सर्वात जास्त पसंती मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दिग्दर्शक निखिल आडवाणी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट २००८ मध्ये दिल्लीतील जामिया नगरमध्ये झालेल्या एनकांउटर च्या घटनेवर आधारित आहे. मिशन मंगलप्रमाणे बाटला हाऊसचा ट्रेलरही दमदार आहे. तज्ज्ञांच्या मते पहिल्या दिवशी सुमारे अठरा ते एकोणावीस कोटी रुपयांपर्यंत हा चित्रपट व्यवसाय करु शकतो. या सिनेमामध्ये जॉनसोबत मृणाल ठाकूर, रवि किशन आणि नोरा फतेही मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

तर मिशन मंगल पहिल्या मंगळ मिशनच्या सत्य घटनेवर आधारित आहे. मिशन मंगलचा ट्रेलरला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी एकवीस ते तेवीस कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करण्याचा अंदाज सुपर सिनेमाने वर्तवला आहे. दोन्ही चित्रपटांमधील स्पर्धा पाहता आतापर्यंतच्या अक्षयचा मिशन मंगल वर्चस्व गाजवणार असल्याचं दिसत आहे. मिशन मंगल मध्ये विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कृती कुल्हारी, शरमन जोशी आणि नित्य मेनन अक्षयसह महत्वपुर्ण भुमिका साकारणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like