प. बंगलाच्या निवडणूकीत गाजणार बाटला हाऊस एन्काऊंटर केस ? कोर्टाच्या निर्णयानंतर भाजप नेत्यानं केली ममता यांच्याकडून माफीची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच काही दिवसांपूर्वी 6 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या 6 राज्यांपैकी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे सर्वाधिक लक्ष आहे. यावेळी बंगाल निवडणुकीत आगामी काळात बाटला हाऊस चकमक प्रकरणाचा मुद्दा भाजपकडून उपस्थित केला जाऊ शकतो. मंगळवारी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या प्रकरणात ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यावर हल्ला करून संकेत दिले. दहशतवादी आरिझ खान याला साकेत कोर्टाने चकमकीत दोषी ठरवल्यानंतर सोमवारी रविशंकर प्रसाद यांनी हल्लााबोल केला. ते म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते की जर ही चकमक बनावट असल्याचे सिद्ध झाले नाही तर त्या राजकारण सोडतील.

आता काय उत्तर देणार ?
कोर्टाच्या निकालाचा संदर्भ देताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, अमरसिंह आणि ममता बॅनर्जी जामिया नगरमधील एका कार्यक्रमात उपस्थित होते आणि चकमकीच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली. मी राजकारण सोडणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. चकमकीची छायाचित्रे पाहून सोनिया गांधींचे अश्रू बाहेर येत असल्याचे सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते. माझा प्रश्न आहे की अद्याप सोनिया गांधींचे अश्रू बाहेर येत आहेत की नाही. रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘दिग्विजय सिंह तुम्हाला काय म्हणायचे आहे. बसपा, सपा, डाव्या पक्षांसह सर्वांनी राष्ट्रीय मुद्दा बनविला होता. खतरनाक दहशतवाद्याला 100 पेक्षा जास्त साक्ष आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे ही शिक्षा मिळाली आहे. ममता बॅनर्जीं तुम्ही माफी मागणार का? ‘