‘कोरोना’ने जगाला हादरवणार्‍या वटवाघळाची मिळाली नवी प्रजाती, रंग पाहून शास्त्रज्ञ देखील चकित

वॉशिंग्टन : एखाद्या मनुष्यात भिती निर्माण करण्यासाठी उलटे लटकलेल्या वटवाघळाची (bat) केवळ एक झलक सुद्धा पुरेशी असते. कोरोना महामारीने जगाला हादरवणारे वटवाघुळ (bat) रंगीत असू शकते अशी कुणी कल्पनाही केली नसेल, केवळ काळ्या रंगाचे वटवाघुळ (bat) अनेकांनी पाहिले असेल. परंतु, शास्त्रज्ञांनी ऑरेंज कलरचे वटवाघुळ शोधून काढले आहे.

वटवाघळाची एकदम नवी प्रजाती
शास्त्रज्ञांनी म्हटले की, ही वटवाघळाची एकदम नवी प्रजाती आहे. याचा रंग नारंगी आहे आणि ते फ्लफी सुद्धा आहे. बुधवारी सायंटिफिक जर्नल अमेरिकन म्युझियम नोव्हिटेट्समध्ये शास्त्रज्ञांनी या वटवाघळाबाबत आपला अभ्यास प्रकाशित केला आहे. या अभ्यासातून समजले की, ही पूर्णपणे वटवाघळाची नवीन प्रजाती आहे.

अफ्रीकन देशात सापडले नारंगी वटवाघुळ
पश्चिम अफ्रीकन देश गिनीमध्ये शास्त्रज्ञांना वटवाघळाची ही आश्चर्यकारक प्रजाती सापडली. टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये एक संस्था बेट कंझर्व्हेशन इंटरनॅशनलचे डायरेक्टर जॉन फ्लॅडर्स यांनी म्हटले की, हे एक प्रकारचे जीवनाचे लक्ष्य होते, परंतु मी कधी विचारही केला नव्हता की ते पूर्ण होईल. ही प्रजाती महत्वपूर्ण आहे, परंतु आश्चर्यकारक दिसणार्‍या प्राण्यांसाठी नेहमी तयार राहता आणि हे प्रत्यक्षात खुपच विलक्षण आहे. त्यांनी म्हटले की, लॅबोरेटरीजमध्ये अनेक नवीन प्रजातींचा शोध घेतला जात आहे, परंतु जंगलात जाऊन अशाप्रकारची पूर्णपणे नवीन प्रजाती शोधणे एकदम नवीन आहे.

न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये सस्तन प्राण्यांच्या क्यूरेटर नॅन्सी सीमन्स म्हणतात की, हे असे आहे की, जसे अनुभवी रिसर्चर्स फिल्डवर गेले आणि त्यांनी तिथे जाऊन एका प्राण्याला पकडले आणि हातात घेतले. ही अशी वस्तू आहे जिची आम्ही ओळख पटवू शकत नाही.

नवीन प्रजातीचे नर-मादी वटवाघुळ शोधले
मायोटिस निंबेन्सिस नावाच्या वटवाघळांची ही नवी प्रजाती गिनीच्या निम्बा पर्वतांवर राहाते. शास्त्रज्ञ थेट हे म्हणत नव्हते की, ही नवीन प्रजाती आहे. त्यांनी अचूक तपासासाठी या वटवाघळाची एक नर-मादीची जोडी सुद्धा पकडली आहे. यानंतर सीमन्सने या प्रजातीच्या नमून्यांची तुलना करण्यासाठी वॉशिंग्टन डीसीमध्ये स्मिथसोनियन नॅशनल म्यूझियमचा आणि लंडनमध्ये ब्रिटिश संग्रहालयाचा दौरा केला.

आनुवंशिक विश्लेषणातून समजले की, हे नारंगी रंगाचे वटवाघुळ आपल्या निकटवर्तीय नातेवाईकांपेक्षा एकदम वेगळे आहे. यामुळेच यास नवी प्रजाती घोषीत करण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते. एक प्रकारे हे काळ्या पंखांच्या वटवाघळाप्रमाणे दिसते परंतु याच्या नारंगी रंगाने त्यास चर्चेत आणले आहे.