पुण्यातील बॅटरी चोर अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील पाटील एस्टेट जवळ असण्याऱ्या झोपडपट्टी मधुन एका वीजतंत्रीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्ती जवळुन 68,000 रुपयाच्या बॅटरी जप्त करण्यात आल्या आहे.

जप्त केलेल्या सर्व बॅटरी या संचिती रुग्णालयात जवळ असणाऱ्या स्मार्ट सिटी प्रोजेक्टला बसविण्यात आल्या होत्या. या प्रकरणी मंगळवारी परमेश्वर जाधवला या इसमाला अटक करण्यात आली आहे.

उलट प्रवास करणाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक

स्मार्ट सिटी सेंटरचे विश्वनाथ कानडे (३९) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी, उपनिरीक्षक डी. एस. शिंदे करत आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले, जाधव हा एक इलेक्ट्रीशन आहे. त्यांने स्मार्ट सिटी प्रोजेक्टला असणाऱ्या बॅटरी हेरल्या व नंतर त्यांची वायर कापुन त्यांना लपवून ठेवले होत्या.

जेव्हा साईट इंजिनियर प्रकल्पाला भेट देण्यास गेले तेव्हा त्यांना हा प्रकार लक्षात आला. शिंदे यापुढे म्हणाले की, जाधव ह्या बॅटरी विकणार होते पण, या आधीच आम्ही त्याला पकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90529ad0-b0d7-11e8-b39b-79d9a7f69da0′]