BBM4 | बिग बॉस मराठीला 4 मिळाले टॉप 5 स्पर्धक; मिड वीकला ‘हा’ खेळाडू …

पोलीसनामा ऑनलाईन : BBM4 | बिग बॉस मराठी 4 हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. या कार्यक्रमाची फायनल लवकरच पार पडणार आहे. बिग बॉस मराठी 4 ला या सीझनमधील टॉप 5 फायनलिस्ट मिळाले आहेत. 8 जानेवारी रोजी हि फायनल पार पडणार आहे. चला तर जाणून घेऊया ते टॉप 5 स्पर्धक कोण आहेत ते…… (BBM4)

या कार्यक्रमात अपूर्वा नेमळेकर हि पहिली फायनलिस्ट आहे. किरण माने बिग बॉस मराठी 4 चे दुसरे फायनलिस्ट ठरले तर अक्षय केळकर हा तिसरा फायनलिस्ट ठरला आहे. तर अभिनेत्री अमृता धोंगडे हि चौथी फायनलिस्ट ठरली आहे. या स्पर्धेत 5 व्या जागेसाठी बिग बॉसच्या घरात चॅलेंजर म्हणून आलेला आरोह वेलणकर आणि ड्रामा क्वीन राखी सावंत यांच्यात चुरस निर्माण झाली होती. अखेर राखी सावंतने यामध्ये बाजी मारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर मिड वीकला आरोह वेलणकर घरातून बाहेर पडला आहे. (BBM4)

बिग बॉस मराठी 4 चा ग्रँड फिनाले 8 जानेवारी रोजी पडणार आहे. या स्पर्धेत अपूर्वा नेमळेकर, किरण माने,
अक्षय केळकर. अमृता धोंगडे आणि राखी सावंत यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :-BBM4 | bigg boss marathi 4 aroh welankar evicted in mid week know the top 5 contestant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस

Tara Sutaria | आदरशी खरंच ब्रेकअप झालं का? या प्रश्नावर तारा सुतारियाने दिली प्रतिक्रिया