BBM4 | ड्रामा क्वीन राखी सावंतचा प्रसादबरोबरचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – BBM4 | अभिनेत्री राखी सावंतने हिंदी बिग बॉसच्या सीझनमध्ये धुमाकूळ घातलाच आहे. आता राखीने मराठी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेत पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मागच्या आठवड्यात विशाल आणि मीरा हे घरातून एक्झिट झाले होते, तर राखी आणि आरोह हे सेफ राहिले होते. सध्या राखीचा प्रसादवर निशाणा असल्याचे दिसत आहे. बिग बॉसमधील (BBM4) एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये राखी प्रसाद सोबत फ्लर्टिंग करताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi 4)

 

राखी सावंतच्या घरात येण्याने अनेक गोष्टी बदलल्याचे दिसले तर राखीदेखील प्रत्येक गोष्टीत ड्रामा क्रिएट करून स्पर्धकांशी भांडताना दिसत आहे. नुकताच घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे, जे पाहून प्रेक्षकही चकित झाले आहेत. कारण इतके दिवस राखी प्रसाद सोबत भांडत होती तर ती आता अचानक त्याच्याशी फ्लर्ट करायला लागल्याचे पाहून प्रेक्षकांनाही काही कळेनासे झाले आहे. (BBM4)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की गार्डन एरियात अपूर्वा, प्रसाद, अमृता देशमुख आणि स्नेहलता ही मंडळी बसली असतानाच
अचानक राखी तिथे येते आणि सगळ्यांना हाय हॅलो करत प्रसादच्या मांडीवर जाऊन पडते आणि त्याला म्हणते मला क ख घ ग शिकव ना.
अचानक राखीच्या या वागण्याला प्रसादही गडबडून जातो आणि हे काय चाललंय म्हणत तिथून उठून जाण्याचा प्रयत्न  करतो.
या सगळ्यात घरातील सदस्य मात्र प्रसादची खिल्ली उडवताना दिसत आहेत,
तर येणाऱ्या काळात राखी अजून काय ड्रामा करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

 

Web Title :- BBM4 | bigg boss marathi 4 rakhi sawant flirting with prasad jawade says teach me ka kha ga video viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात