BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूंची निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BCCI ने त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची निवड जाहीर केली आहे. या निवड समितीमध्ये भारताच्या तीन माजी क्रिकेटपटूंची वर्णी लागली आहे. यामध्ये अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. हे तिघेही भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. BCCI ने जाहीर केलेल्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये अशोक आणि जतीन यांचा समावेश नव्याने केला आहे, तर सुलक्षणा नाईक यांना कायम ठेवण्यात आले आहे. जतीन परांजपे यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत, तर प्रथम श्रेणीत 95 डावांत त्यांनी 3 हजार 964 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी 13 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय लिस्ट एच्या 44 सामन्यांत 1040 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 3 अर्धशतके यांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या T- 20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडविरुद्ध नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता.
हा पराभव BCCI च्या जिव्हारी लागल्याने त्यांनी चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील समितीची हकालपट्टी केली होती.
यानंतर नवीन समितीसाठी अर्ज मागवण्यात आले होते.
आता अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांची त्रिसदस्यीय समिती नव्या
अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या नियुक्ती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

 

Web Title :- BCCI | bcci elected cricket advisory committee of three members all former players of team india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi | बिग बॉस सध्या सुट्टीवर असताना ‘या’ स्पर्धकाने घातला घरात वाद; आता काय घडणार घरात?

Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं

Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर