BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या संकटामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 14 व्या मोसमातील काही सामने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हे सामने झाले नाही तर बीसीसीआयला (BCCI) मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागणार असल्याने बीसीसीसीआयने हे सामने खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याची घोषणा केली आहे (BCCI Big Announcement). बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ‘आयएएनएस’शी बोलताना हि माहिती दिली.

भारतात कोरोनाचे संकट पाहता  टी -20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धा बीसीसीआय यूएईमध्ये (UAE) आयोजित करू शकते, अशी शक्यता आहे.
यांदर्भात आयसीसीकडे स्पष्टीकरण देण्यासाठी 28 जूनपर्यंत मुदत बीसीसीआयन मागितली आहे.
आयपीएल 2021 मधील 29 सामने यापूर्वीच खेळविण्यात आले आहेत.
दरम्यानच्या काळात अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाचा संसर्ग झाला आणि परिणामी कोरोनाच्या संक्रमणामुळे आयपीएलचं 14 वं पर्व अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावं लागलं.
उर्वरित सामने आता युएईमध्ये होणार असून बीसीसीआयच्या नियोजनानुसार टी -20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेच्या आधी हे सामने खेळवले जातील.
मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टी -20 विश्वचषकांच्या तारखांची अधिकृत घोषणा केलेली नसून जुलैमध्ये अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे.

परदेशी खेळाडूंचा मुद्दा महत्त्वाचा

आयपीएलच्या नियोजनात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, तो म्हणजे परदेशी खेळाडू आणि त्यांच्या सुरक्षेचा.
यावरच अधिक चर्चा होणार असून काही दिवसापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू टी-20 विश्वचषकासारख्या (T20 World Cup) मोठ्या स्पर्धेआधी आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे सांगितले होते.
त्यामुळे इतर क्रिकेट बोर्डांची काय भूमिका आहे, यावर ही चर्चा करण्यात येणार आहे.

आयपीएलमधील संघाना बीसीसीआयवर विश्वास

बीसीसीआय स्पर्धेचे योग्यप्रकारे नियोजन करून परदेशी खेळाडूंना स्पर्धेसाठी नक्की आणेल असा विश्वास आयपीएलमधील संघाना आहे.
यांदर्भात बोलताना एक अधिकारी म्हणाले की, बैठकींनंतर आम्हाला समजलं कि परदेशी खेळाडूंशी बीसीसीआय चर्चा करत असून त्याच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करत आहे.
आम्हाला काही खेळाडूंची कमी भासू शकते, त्याबाबत लक्ष देण्याची गरज असलयाचेहि त्यांनी सांगितले.

फायद्याची गोष्ट ! पीपीएफ अकाऊंटमध्ये 10 वर्षाच्या मुलांच्या नावाने दरमहा 500 रूपये जमा करून 28 लाख मिळवण्याची संधी, जाणून घ्या

Web Title :  bcci big announcement ipl 2021 uae september 19 to 15 octomber