Coronavirus : BCCI नं उचललं मोठं पाऊल, ‘कोरोना’मुळं सर्व स्पर्धा तुर्तास ‘रद्द’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी मोठा निर्णय घेतला. आतापर्यंत बीसीसीआयने पुढील आदेश होईपर्यंत खेळल्या जाणार्‍या सर्व घरगुती स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बीसीसीआयच्या प्रतिष्ठित रणजी करंडक विजेत्या आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात होणाऱ्या इराणी चषकचाही समावेश आहे. बीसीसीआयचा हा निर्णय क्रिकेट चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या आरोग्यास लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने पुरुष आणि महिला क्रिकेट संघांदरम्यान खेळल्या जाणार्‍या फॉरमॅटची स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विजय हरारे ट्रॉफी, इराणी कप, सिनियर महिला वनडे नॉट आउट, सिनिअय महिला वनडे चॅलेंजर्स, महिला अंडर 19 टी -20 लीग याक्षणी होणार नाहीत.

उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचे दोन सामनेही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात इंडियन प्रीमियर लीगही (IPL) 15 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता, सर्व क्रिकेट बोर्ड एक-एक करून मालिका रद्द करीत आहेत. शनिवारीच क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट न्यूझीलंडने दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या एकदिवसीय मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी इंग्लंडच्या संघाने मालिका न खेळता श्रीलंकेकडून परतण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरादेखील कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलण्यात आला.