Coronaviurs : ‘कोरोना’च्या विरोधातील लढाईसाठी BCCI कडून 51 कोटींची मदत

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा वाढता विळखा लक्षात घेता बीसीसीआय देखील मदतीचा हात दिला आहे. कोरोना महामारीच्या लढ्यात बीसीसीआयने पंतप्रधान मदतनिधीला 51 कोटींची मदत जाहीर केली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि इतर अधिकार्‍यांनी बैठकीत याबद्दल निर्णय घेतला .

कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी मदत करण्यात येत आहे. तसेच उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था, कलाकार, राज्य शासनाच्या बरोबरीने मदत करत आहे. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींही याला हातभार लावत आहेत. बीसीसीआय देखील या लढ्यात सहभागी झाली असून पंतप्रधान मदतनिधीला 51 कोटींची मदत जाहीर केली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि इतर अधिकार्‍यांनी बैठकीत याबद्दल निर्णय घेतला.

कोरोनाविरोधातील लढ्यात देशातील आपत्कालीन सुविधेला अधिक बळ मिळावे असे बीसीसीआयने परिपत्रक काढले आहे. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. तर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे कोरोनाविरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री निधीला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like