BCCI नं घेतला मोठा निर्णय, सौरव गांगुलीची ‘दादा’गिरी 9 महिने नव्हे तर ‘एवढे’ वर्ष चालणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड बीसीसीआयच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. सौरव गांगुलीकडे अध्यक्षपद आल्यानंतर त्यानं क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून एक-एक करून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे डे-नाईट कसोटी सामना. खरं तर सौरव गांगुलीची निवड ही फक्त ९ महिन्यांसाठी करण्यात आली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या लोढा समितीनुसार सौरव गांगुलीचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयने रविवारी सर्वोच्च न्यायालयाने पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा ९ महिन्यांचा कार्यकाळ वाढवून पुढे नेण्याचा प्रयत्न बीसीसीआयकडून करण्यात आला आहे. हा निर्णय बीसीसीआयच्या ८८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मान्यता देखील घ्यावी लागणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की सर्व प्रस्तावित दुरुस्ती मंजूर झाल्या आहेत आणि आता सर्वोच्च न्यायालयात पाठविण्यात येतील. त्यामुळे पुढील काळात सौरव गांगुली अजून कोणते नवीन निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.

२०२४ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहू शकतात गांगुली
सध्याच्या घटनेनुसार एखाद्या अधिकाऱ्यानं बीसीसीआय किंवा राज्य संघटनेत सामील होऊन तीन वर्षे दोन वर्षे पूर्ण केली असतील तर त्याला तीन वर्ष कूलिंग ऑफ कालावधीवर जावे लागते. गांगुली ५ वर्षे ३ महिने बंगाल क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांची एकून कामगिरी बघता आणि क्रिकेटमधील योगदान बघता त्यांना क्रिकेटचा दांडगा अनुभव देखील आहे. ऑक्टोबरमध्ये गांगुली हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. गांगुलीनं २ ऑक्टोबरला बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन पदभार सांभाळला. मात्र त्यांची नेमणूक ही फक्त ९ महिन्यांसाठी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा कार्यकाळ वाढवला आहे. २०२४ पर्यंत सौरव गांगुली या पदावर राहू शकतात. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात दादा म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गांगुलींच्या हातून अजून बरेच काही बदल होऊ शकतात.

बीसीसीआयला मजबूत करण्याचा हा प्रयत्न
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांचा असा विश्वास आहे की सर्व प्रस्तावित दुरुस्ती ही मंडळाची रचना मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करणारी आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच या सर्व घडामोडी घडत असल्याचे वृत्त पुढे येत आहे. मात्र यासाठी थोडं थांबावं लागणार आहे कारण सर्वोच्च न्यायालयाकडून मान्यता मिळाल्यानंतरच या सर्व गोष्टींची अंमलबजावणी होईल. प्रशासकीय संकटामुळे जवळपास तीन वर्षांपासून बीसीसीआयची आयसीसीमध्ये असलेला वचप कमी झाला आहे. त्यामुळं ही अशी परिस्थिती लक्षात घेता असे प्रस्तावित केले आहे की अनुभवी व्यक्तीने आयसीसीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व केले पाहिजे आणि यासाठी वयाची मर्यादा ७० वर्षे लागू होणार नाही. या अनुषंगाने सौरव गांगुली यांच्याकडे अनुभव तर आहेच पण त्या क्षेत्राबाबत पुरेपूर परिचित देखील आहेत. त्यामुळे त्यांची नेमणूक होणे हे बीसीसीआयचे यश म्हणावे लागेल.

Visit : Policenama.com