पैसे न घेता देखील राहुल द्रविडवर गंभीर आरोप, BCCI ची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि कर्णधार राहुल द्रविड याच्यावर बीसीसीआयने गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर त्याला एक नोटीस पाठवण्यात अली असून या नोटिसला १४ दिवसांच्या आत उत्तर देखील पाठवावे लागणार आहे. राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख असून त्याचबरोबर तो भारताच्या अंडर १९ संघाचा प्रशिक्षक देखील आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी राहुल द्रविड हा बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्याला हि नोटीस पाठवण्यात आल्याचे समजते. राहुल द्रविडक़र गंभीर आरोप करताना बीसीसीआयचे अधिकारी डी.के. जैन यांनी सांगितले कि, याविषयी आमच्याकडे तक्रार अली होती. त्याला अनुसरून द्रविडला आम्ही ही नोटीस पाठवली असून तो लवकरच त्यावर उत्तर देईल अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यामुळे केले जात आहेत आरोप

राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख असून त्याचबरोबर तो इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष देखील आहे. त्याचबरोबर इंडिया सिमेंट या कंपनीचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यामुळे त्याचे हितसंबंध जपले जात असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येत होता. मात्र आता बीसीसीआयने नोटीस पाठवल्यानंतर त्याला याचे उत्तर देणे यापुढे बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, द्रविडला बजावण्यात आलेल्या या नोटिसनंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू कर्णधार सौरव गांगुली आणि हरभजन सिंह यांनी बीसीसीआयवर कडक शब्दात टीका करत द्रविडची पाठराखण केली होती. भारतीय क्रिकेटला द्रविडसारखा चांगला माणूस मिळणार नाही अशा शब्दात हरभजन सिंह याने बीसीसीआयवर टीका केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –