अखेर BCCI ‘झुकलं’, टीम इंडियाचे खेळाडू आता NADA च्या ‘रडार’वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विरोधाला अखेर न जुमानता नाडाने बीसीसीआयला (उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी)च्या नियमांमध्ये सामील करून घेतले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे सचिव राधेश्याम जुलानिया यांनी बीसीसीआयचे सचिव राहुल जोहरी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.


या निर्णयामुळे आता भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना देखील डोपिंग तपासणी करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता खेळाडूंच्या अडचणीत वाढ होणार आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या वादावर या निर्णयाने अखेर पडदा पडला आहे. बीसीसीआयने या प्रक्रियेत वापर करण्यात येणाऱ्या किटच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे आम्ही त्यांना या प्रकरणी आश्वस्त केले असून त्यांना ज्या प्रकारच्या सुविधा हव्या आहेत त्या आम्ही त्यांना पुरविणार आहोत. मात्र त्यासाठी बीसीसीआयला काही शुल्क द्यावे लागणार आहे. असे राधेश्याम जुलानिया यांनी सांगितले.

अखेर बीसीसीआयची माघार
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अनेकदा ताकीद देऊनही बीसीसीआय नाडामध्ये येण्यास नकार देत होती. मात्र अखेर सरकारपुढे त्यांना झुकावे लागले. भारतातील इतर खेळातील खेळाडू नाडा अंतर्गत येतात, मात्र बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना यामध्ये सहभागी होण्यास नकार दर्शवला होता. मात्र आता खेळाडूंना या समावेशामुळे सावधानता बाळगावी लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त