India vs England Test : उर्वरीत 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर ! मुंबईच्या खेळाडूला केलं रिलीज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चेन्नईमधील दुसरी कसोटी जिंकल्यानंतर 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केल्यानंतर आता टीम इंडियानं उर्वरीत 2 कसोटी सामन्यांसाठी आज संघ जाहीर केला आहे. मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांना विश्रांती देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. बीसीसीआय शमीच्या नावाचा विचार करेल अशी अपेक्षा होती. या संघात शार्दूल ठाकूर यांचंही नाव वगळण्यात आलं आहे. त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज करण्यात आलं आहे. त्याच्याजागी उमेश यादव याचं नाव जाहीर केलं गेलं आहे. उमेशला फिटनेस टेस्टमध्ये पास व्हावं लागणार आहे. पहिली कसोटी खेळणाऱ्या शाहबाज नदीम यालाही रिलीज करण्यात आलं आहे.

नेट बॉलर्स – अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर्स, कृष्णाप्पा गोवथम, सौरभ कुमार

राखीव खेळाडू – केएस भरत, राहुल चहर

टीम इंडिया – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, वृद्धिमान सहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर आता जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली. तर इंग्लंडची पुन्हा चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. भारताच्या खात्यात 460 गुण (69.7%) आहेत, इंग्लंडच्या खात्यात 442 गुण (67 टक्के) आहेत. जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी इंग्लंडला आता उर्वरीत दोन्ही सामने जिंकावे लागतील. 3-1 असा विजय त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून देऊ शकतो. भारतानं ही मालिका जिंकली तर त्याचं अंतिम फेरीतील स्थान पक्कं होईल. परंतु ही मालिका 2-2 किंवा 1-1 अशा बरोबरीत सुटल्यास ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करेल.