मोदी, अमित शहांनी ‘ग्रिन सिग्नल’ दिल्यास भारत-पाकचा ‘हायहोल्टेज’ क्रिकेटचा ‘ड्रामा’ भारतात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बालाकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या तणावपूर्ण वातावरणात आता बीसीसीआयने पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानच्या तणावपूर्ण वातावरणात केंद्र काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवून या दौऱ्यासाठी परवानगी मागितली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या तणावामुळे मागील ६ वर्षांत उभय संघांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका रंगलेली नाही. मात्र आता महिला विश्वचषकासाठी बीसीसीआयने परवानगी मागितली आहे. बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (क्रिकेट ऑपरेशन्स) साबा करीम यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी बीसीसीआयची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

या पत्रात त्यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले होते कि,“आयसीसीतर्फे वुमन्स चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाते. यात संघांना एकमेकांविरुद्ध देशात आणि देशाबाहेरील मैदानांवर खेळावे लागते. या स्पर्धेतील गुण विश्वचषकातील पात्रतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात”. त्यामुळे आता केंद्रीय क्रीडा मंत्रालय काय निर्णय घेते आणि पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी परवानगी देते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसीच्या स्पर्धांत एकमेकांशी खेळतात.