IPL नंतर आता ‘या’ लीगमध्ये ‘फिक्सिंग’ ! भारताच्या युवा खेळाडूचा समावेश ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरण नवीन नाही. मात्र मागील काही वर्षांपासून अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर आता आणखी एका लीगमध्ये फिक्सिंग झाल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भारतीय खेळाडूचा, आयपीएलमधील एक जनाचा आणि एका रणजी प्रशिक्षकाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली असून सट्टेबाज आणि मॅच फिक्सरच्या सांगण्यावरून एका संघातील खेळाडू खेळत असल्याची माहिती समोर आली आहे. टीएनपीएलमध्ये हि घटना घडली आहे.

यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार देखील देण्यात आली असून संपूर्ण स्पर्धेत असा प्रकार घडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामधील काही व्यक्ती सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याची देखील माहिती मिळत आहे. याविषयी बोलताना बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी समितीचे प्रमुख अजित सिंग यांनी बोलताना सांगितले कि, काही खेळाडूंनी आमच्याकडे संपर्क केला असून यासंदर्भात ते कोण आहेत याचा आम्ही तपास करत आहोत. त्याचबरोबर आम्हाला काही व्हाट्सअप मॅसेज मिळाले असून त्याचादेखील तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता हि घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या मॅच फिक्सिंग प्रकरणात युवा खेळाडू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, टीएनपीएलमध्ये एकूण 8 संघ खेळात असून यामध्ये भारताचे लोकप्रिय खेळाडू देखील खेळात असल्याने या घटनेकडे बीसीसीआयने गांभीर्याने पहिले असून याचा तपास सुरू केला आहे. यामध्ये आर अश्विन, मुरली विजय, विजय शंकर, दिनेश कार्तिक, वॉशिंग्टन सुंदर हे भारतीय खेळाडू देखील विविध संघांकडून खेळत आहेत.

You might also like