मंदीनं घेतली IPLची ‘विकेट’ !, विजेत्याला नाही मिळणार 20 कोटी , मिळणार फक्त ‘एवढी’ रक्कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात सर्वत्र मंदीची झळ बसत असताना. आता इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच (IPL) ला देखील मंदीचा चटका लागला आहे. आगामी आयपीएल चा खर्च कमी करताना बीसीसीआयने विजेत्या आणि उपविजेत्या संघाची बक्षिसाची रक्कम थेट कमी करून अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींना पाठवलेल्या परिपत्रकात बीसीसीआयने 20 कोटींच्या ऐवजी आयपीएल विजेत्या संघाला केवळ 10 कोटी मिळण्याची माहिती दिली आहे.

बीसीसीआयच्या पत्रानुसार, खर्च कमी करण्याच्या प्रक्रियेअंतर्गत बक्षिसाची रक्कम निश्चित करण्यात आली आहेत. विजेत्या संघाला 20 कोटी ऐवजी 10 कोटी रुपये मिळतील.

उपविजेत्या संघाला 12 करोड 50 लाख रुपयांऐवजी 6 करोड 25 लाखाचं दिले जातील. तसेच क्वालिफायर मध्ये हरणाऱ्या दोन्ही संघाना प्रत्येकी 4 करोड 37 लाख 50 हजार मिळतील.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “सर्व फ्रॅन्चायझींची स्थिती ठीक आहे.” त्यांच्याकडे प्रायोजकत्व यासारखे उत्पन्न वाढविण्याचे अनेक मार्ग आहेत. म्हणूनच बक्षीस रकमेबाबत हा निर्णय घेण्यात आला.

तसेच, आयपीएल सामन्याचे आयोजन करणार्‍या राज्य संघाला 1 कोटी रुपये देण्यात येणार असून, त्यात बीसीसीआय आणि फ्रँचायझी दोघेही 50 लाख रुपयांचे योगदान देतील.