केएल राहुल आणि पांड्यासाठी करणची कॉफी ‘कडू’ ; बसला ‘इतक्या’ लाखांचा दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कॉफी वुईथ करण या कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे अखेर क्रिकेटपटू के.एल.राहुल आणि हार्दिक पांड्या या दोघांना बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. या दोघांना एकूण २० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची ही रक्कम या दोघांना चार आठवड्यात जमा करण्यास संगितली आहे. याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

या दोघांना १० निमलष्करी दलाच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून प्रत्येकी १ लाख रूपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय अंध क्रिकेटपटूंच्या असोसिएशनला १० लाखांची रक्कम देण्याचेही आदेश दिले आहेत. ही रक्कम जमा करण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत देण्यात आली असून जर ही रक्कम जमा करण्यात आली नाही तर ती त्यांच्या मॅच फीमधून कापून घेण्यात येणार आहे.

काय आहे के.एल.राहुल आणि पांड्या प्रकरण

पंड्या आणि राहुल यांनी एका टीव्ही शो दरम्यान केलेल्या अश्लिल वक्त्यव्यांमुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. सोशल मीडियावर तसेच प्रसिद्धीमाध्यमांनीही त्यांना या कृत्याबद्दल धारेवर धरले. शेवटी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, पण नंतर ती मागे घेऊन लोकपालाच्या मार्फत चौकशीचा निर्णय घेतला होता. नुकत्याच वर्ल्ड कप साठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये देखील त्यांच्या समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या टीम मधील निवडीवरून देखील सोशल माध्यमावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

Loading...
You might also like