BCCI On Virat Kohli | ‘किंग’ कोहली IPL मधील फॉमर्मुळे गमावू शकतो भारतीय T-20 च्या संघातील जागा; BCCI ने दिले संकेत!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BCCI On Virat Kohli | आयपीएलचा (Tata IPL 2022) 15 वा हंगाम चालू असून त्यामध्ये भारताचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) खराब फॉर्ममध्ये असलेला पाहायला मिळत आहे. विराट कोहलीकडून (Virat Kohli) आरसीबीला (Royal Challengers Bangalore) दोनवेळा मोठ्या खेळ्या आल्या आहेत. त्याही अर्धशतकापर्यंत गेल्या नाहीत. कोहलीला याचा फटका बसण्याची शक्यता असून आता बीसीसीआयनेही (BCCI) तशाप्रकारचे संकेत दिले आहेत. (BCCI On Virat Kohli)

 

विराट कोहलीचा आत्ताचा फॉर्म पाहता याबाबत निवड समितीमध्ये चर्चा चालू असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. इनसाइडस्पोर्ट्सने याबाबत माहिती वृत्त दिलं आहे. विराटने भारतीय क्रिकेटमध्ये भरपूर योगदान दिलं आहे मात्र त्याचा आताचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. निवड प्रक्रियेमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. विराट आणि इतर कोणत्याही खेळाडूबद्दलचा हा निर्णय निवड अधिकाऱ्यांचा असून आम्ही आमचं मत त्यांना सांगत नसल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं. (BCCI On Virat Kohli)

राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chairman of the National Selection Committee Chetan Sharma) यांना संपर्क साधल्यावर त्यांनी याबद्दल बोलण्यास नकार दिला. या विषयावर मला बोलायचं नाही म्हणत त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला. त्यामुळे कोहलीला आता पूर्वीप्रमाणे प्रदर्शन करावं लागणार आहे. नाहीतर त्याच्यावर संघातील स्थान गमवायची वेळ येणार आहे.

 

दरम्यान, विराट कोहली आता खेळताना बिचकत असल्याचं दिसत आहे.
विराट कोहली सलग दोनवेळा धावबादही झाला आहे.
कोहली बाद झाल्यावर ज्याप्रकार रिअॅक्शन देतो ते पाहून त्याच्यातील आत्नविश्वास कमी झाल्याचं दिसत आहे.
कोहलीला आता उर्वरित आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आपली छाम उमटवण्याची गरज आहे.

 

Web Title :- BCCI On Virat Kohli | bcci official admits virat kohlis form now a cause of huge concern can lose his place in indian t20 squad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा