अबब ! टीमच्या इंडियाच्या ‘कोचिंग स्टाफ’मध्ये नोकरी करण्यासाठी 2000 अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार असल्याचे माहिती मिळत आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांनी देखील आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली नसल्याने त्यांच्यावर देखील नाराजी मोठया प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यानंतर बीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफमधील देखील काही जणांची सुट्टी होणार असल्याने या पदांसाठी देखील अर्ज मागवले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक कोन असणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

यासाठी बीसीसीआयने ३० जुलैपर्यंत अर्ज मागवले होते. त्यानंतर अनेक जणांनी या पदासाठी अर्ज मागवले असून या संदर्भात बीसीसीआय अर्ज तपासणी करत असून १४ किंवा १५ ऑगस्ट रोजी या पदांसाठी मुलाखत होऊ शकते. या पदांसाठी अर्ज मागवले असून यामध्ये आतापर्यंत पाच जण या शर्यतीत आघाडीवर असून कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची निवड करणार आहे. कर्णधार कोहालीला मात्र या प्रक्रियेत विचारले जणार नसल्याचे समजत आहे. त्यामुळे आता सल्लगार समिती काय निर्णय घेते त्यावर सर्व काही अवलंबून आहे. टॉम मूडी, ग्रेग चॅपल, माइक हेसन,लालचंद राजपूत, रॉबिन सिंह यांसारख्या माजी दिग्गज खेळाडूंनी या पदासाठी अर्ज केले आहेत. त्याचबरोबर इतर सर्वांचे मिळून बीसीसीआयकडे जवळपास २ हजार अर्ज आल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, भारतीय संघाच्या प्रशिक्षकपडची निवड हि माजी कर्णधार कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार असून या समितीत माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि महिला संघाची माजी खेळाडू शांता रंगास्वामी यांचा देखील समावेश आहे.

You might also like