नवीन IPL संघांबाबत BCCI चा मोठा निर्णय, काही महिन्यांसाठी पुढे ढकलल्या निविदा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संकटामुळे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2021 अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता रिपोर्ट समोर आला आहे की, भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने काही काळासाठी नवीन आयपीएल संघांसाठी निविदा जारी करण्याची योजना स्थगित करण्याच्या तयारी आहे. आयपीएल 2021 सुरू होण्याच्या अगोदर ही माहिती समोर आली होती की, बीसीसीआय 2 नवीन संघांच्या निविदा जारी करणार आहे, ज्या आयपीएल 2022 किंवा 2023 मध्ये टुर्नामेट भाग घेतील.

माहितीनुसार, बीसीसीआयने नवीन आयपीएल संघांसाठी मे 2021 मध्ये निविदा जारी करण्याची योजना बनवली होती. परंतु कोरोना महामारीमुळे आता ती जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपैकी एकाच्या संदर्भाने सांगण्यात आले आहे की, बोर्ड सध्या आयपीएल 2021 च्या अर्धवट राहिलेल्या सत्राबाबत जास्त चिंताग्रस्त आहे आणि नवीन संघांवर कोणतीही चर्चा सुरू नाही.

बीसीसीआय अधिकार्‍याच्या संदर्भाने एका स्पोर्ट वेबसाइटने लिहिले आहे की, सध्या आयपीएलच्या नवीन संघांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ योग्य नाही. आम्हाला प्रथम स्थगित सत्रावर पुढील मार्ग ठरवावा लागेल आणि त्यांनतर आयपीएल 2022 साठी नवीन संघांवर निर्णय घेतला जाऊ शकतो. याबाबत बीसीसीआयमध्ये या स्तरावर कोणतीही चर्चा सुरू नाही. आम्ही जुलैच्या अगोदर कोणतीही चर्चा करणार नाही.

कधीपर्यंत नवीन आयपीएल संघांसाठी टेंडर जारी केले जाईल. यावर उत्तर देताना अधिकार्‍याने सांगितले की, आम्ही या स्तरावर कोणतीही कालमर्यादा देऊ शकत नाही. जसे की मी सांगितले, याबाबत सध्या बीसीसीआयमध्ये कोणतीही चर्चा सुरू नाही.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर एका न्यूज एजन्सीच्या संदर्भाने सांगितले होते की, 10 संघांची आयपीएल पुढील वषर्त्तपासून सुरू होईल आणि नवीन फ्रेंचायजीची लिलाव प्रक्रिया आणि अंतिम स्वरूप यावर्षी मे महिन्यापर्यंत पूर्ण केले जाईल. सूत्राने सांगितले होते की, संघांना अंतिम रूप दिल्यानंतर, ते आपले संचालन कार्य सुरू करू शकतात, ज्यामध्ये काही वेळ लागतो.